Mon. Mar 31st, 2025

सेवा समर्पण परिवारच्या अध्यक्षपदी दिगंबर देशमुख ; तर उपाध्यक्षपदी गंगाधर तमलवाड यांची निवड

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : गेल्या ६ वर्षांपासून भोकर तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक,कृषि,जलसंधारण,वृक्ष संवर्धन प्रकारे विविध क्षेत्रात सेवाभावाने समाजोपयोगी काम करत असलेल्या सेवा समर्पण परिवार भोकर च्या अध्यक्षपदी दिगंबर देशमुख व उपाध्यक्षपदी गंगाधर तमलवाड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
सेवाभावी काम करुन त्याचे निस्वार्थ समर्पण करण्याच्या उदात्त हेतूने गेल्या ६ वर्षापुर्वी सेवा समर्पण परिवाराची स्थापना झाली.या परिवाराचे पहिले अध्यक्ष म्हणून बालाजी तुमवाड व दुसरे अध्यक्ष म्हणून राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी उत्कृष्टरित्या जबाबदारी पार पाडली.सेवा समर्पण परिवार च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. २९ मार्च २०२५ रोजी एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली व या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी दिगंबर देशमुख यांची व उपाध्यक्षपदी गंगाधर तमलवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सद्या सेवा समर्पण परिवार कडून कातळगाळ अभियान सुरू असून नारवट परिसरात दररोज दोन तास श्रमदान करून सी.सी.टी. खोदण्याचे काम सुरू आहे.तर उपरोक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सेवा समर्पण परिवारातील सर्व सदस्यांसह विविध स्तरातून  अभिनंदन होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !