शिवजन्मोत्सव समिती भोकर च्या अध्यक्षपदी संदिप पाटील गौड यांची निवड
तर सचिवपदी आनंद डांगे यांची निवड…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी भोकर येथे प्रथमच विविध सामाजिक प्रवर्गातील समाज बांधवांची दि.२ फेब्रुवारी रोजी एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली आणि या बैठकीतून सर्वानुमते निवडण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव समिती भोकर-२०२४ च्या नुतन कार्यकारिणी अध्यक्षपदी सामाजिक युवा नेतृत्व संदिप पाटील गौड कोंडलवार यांची तर सचिवपदी युवा नेतृत्व आनंद डांगे यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व सामान्य समाज घटकातील विविध सामाजिक प्रवर्गातील समाज बांधवांनी एकत्र येऊन देशाचा स्वाभिमान,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला असून याच अनुषंगाने दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री हनुमान मंदिर,जेठीबा नगर भोकर येथे एक व्यापक बैठक घेण्यात आली.तसेच झालेल्या चर्चेअंती सर्वानुमते शिवजन्मोत्सव समिती-२०२४ ची कार्यकारिणी निवडण्यात आली.त्या कार्यकारिणीचे उर्वरित पदाधिकारी पुढील प्रमाणे…
उपाध्यक्ष-दिपक निळकंठ वर्षेवार,मोहन राठोड,सहसचिव-माधव पाटील बोरगावकर,कोषाध्यक्ष-विजय पवार,प्रसिद्धी प्रमुख-आदिनाथ चिंताकुंठे,अनिल डोईफोडे यांची निवड करण्यात आली असून,सल्लागार म्हणून भोकर येथील विविध पक्ष,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक नेत्यांची निवड करण्यात आली आहे.तर या महत्वपुर्ण बैठकीस माधवराव अमृतवाड,सुरेश बिल्लेवाड,निळकंठ वर्षवार,ॲड. परमेश्वर पांचाळ,ॲड.शेखर कुंटे,संतोष आलेवाड,सिताराम मेटकर,पांडूरंग वर्षेवार,सुभाष नाईक,कृष्णा पाटील कोंडलवार, लालू धोत्रे,संतोष आणेराये,राठोड, बाळू मेटकर,बालाजी एलपे, अंकुश रतनवार,व्यंकट मेटकर,दीपक मेटकर,बाळासाहेब देवकर,बालाजी देवकर,दत्ता बोईनवाड यांसह बहुसंख्य बहुजन बांधवांची उपस्थिती होती.सर्व उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यथोचित स्वागत करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून भोकर शहरात प्रथमच बहुजन समाजातील असंख्य मावळे एकत्र येऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा साजरा करणार असल्याने शिवजन्मोत्सव कार्यकारिणी च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.