सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कारासाठी सौ.अंजली कानिंदे (मुनेश्वर) यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : भारतीय पिछडा शोषित संघटनेने संबंध देशात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजणी साजरा करण्याचे ठरविले असून त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल कंधार च्या शिक्षिका सौ.अंजली कानींदे (मुनेश्वर) यांची ‘सत्यशोधक शिक्षक रत्न पुरस्कार- २०२४’ साठी निवड करण्यात आली आहे.
शिक्षिका सौ.अंजली कानींदे (मुनेश्वर) यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदान व मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करण्याचे कार्य आणि जातीविरहित भारत निर्माण करण्यासाठी देत असलेले योगदानाची दखल घेऊन उपरोक्त समितीने त्यांची ‘शिक्षकरत्न पुरस्कारासाठी’ निवड केली आहे. त्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.यापूर्वीही सौ.अंजली कानींदे यांना अविष्कार फाऊंडेशन चा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’,महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’,जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र तर्फे ‘जिजाऊ पुरस्कार’ यांसह आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सौ.अंजली कानिंदे (मुनेश्वर) यांच्या अध्यक्षते खाली दि.२३ मे २०२३ रोजी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महिलांनी पुढाकार घेऊन बौद्ध विवाह मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते. तसेच दि.७ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या ‘सावित्री-रमाई जयंती महोत्सव’ संयोजन समितीच्या त्या अध्यक्षा होत्या.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर राहणाऱ्या सौ.अंजली कानिंदे (मुनेश्वर) यांना शिक्षकरत्न हा पुरस्कार बुधवार,दि.१० जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता प्रा. नरहर कुरुंदकर सभागृह,पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी एस.जी.माचनवार (राष्ट्रीय अध्यक्ष बीपीएसएस),डाॅ.व्यंकटेशजी काब्दे (माजी खासदार), लक्ष्मणराव हाके (राज्य मागासवर्ग आयोग सदस्य),बालाजी ईबितवार,पद्माकर बाबरे, दैवशाला पांचाळ,अरुणा पुरी,पद्मा झंपलवाड,नामदेराव आयलवाड (ओबीसी नेते),चंद्रकला चापलकर यांची प्रमुख राहणार आहे.