कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीमेस प्रारंभ…!
यशवंत परब-अंबुज प्रहार विशेष
टिटवाळा : रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि.अध्यक्ष सुनील उतेकर आणि कोंकण रहिवाशी मंडळ टिटवाळा रजि.संस्थापक अध्यक्ष बुवा यशवंत परब,उपाध्यक्ष शंकर पेडूरकर,सचिव निलेश राणे,खजिनदार,गुणाजी गावडे, कार्याध्यक्ष प्रवीण टोले, सचिन परब, प्रकाश चौगुले,सौ.सिमा पिपुटकर,सौ. प्रेमलता तावडे सल्लागार संतोष राणे आणि सहकारी यांनी कोंकणात प्रवाशांसाठी कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी टिटवाळा येथे सह्यांची मोहीम सुरू केली.
कोंकणातील चाकरमानी नौकरदारांना कोंकणात जाण्यासाठी नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो.यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत,आपल्या मुला बाळांसह सणवार, होळी,गणपती तसेच इतर उत्सवादरम्यान रेल्वेने जाणे येणे गर्दीमुळे धोक्याचे झाले आहे.यासाठी कल्याण आणि परिसरात लाखो कोंकणकर राहतात यासाठी कल्याण ते सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी यासाठी संघटना अध्यक्ष सुनील उतेकर आणि सहकारी गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
यास अनुसरून कोंकण रेल्वे प्रवाशांच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष द्यावे व रेल्वे सुरू व्हावी यासाठी अनेल रेल्वे स्टेशन परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा प्रारंभ टिटवाळा रेल्वे स्टेशन येथून करण्यात आला आहे.मांडा टिटवाळा रिक्षा युनियन अध्यक्ष बाळा भोईर यांच्या हस्ते या मोहिमेस सुरुवात करण्यात आली.रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था अध्यक्ष सुनील उतेकर,यशवंत परब अध्यक्ष, संपादक संभाजी मोरे,राजेंद्र गावडे,गोपिचंद घाटये,दिलीप गायकवाड,योगेश चांदोरकर,सौ.करूणा परब,सुपर्णा गावडे, सुनीता खोकले,स्नेहा मिटबावकर यांसह शेकडो कोंकणकर यावेळी उपस्थित होते.यावेळी कोंकणात नवीन आणि हक्काची कल्याण-सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी यासाठी हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.तसेच संस्थेने नवीन पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती दिली व नियुक्तीपत्र,शॉल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.