भोकर येथील जेष्ठ नागरिक मोहन रामन्ना कोंडलवार यांचे दु:खद निधन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील कलाल समाजातील जेष्ठ नागरिक तथा जुन्या पिढीतील जिनिंग व्यावसायिक मोहन रामन्ना गौड पाटील कोंडलवार (८१) रा.मुधोळ गल्ली भोकर यांचे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळी आजाराने उपचारा दरम्यान दि.१२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी दु:खद निधन झाले आहे.
स्व.मोहन रायन्ना गौड पाटील कोंडलवार हे येथील कलाल समाजातील जेष्ठ नागरिक होते.त्यांनी मजूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन असतांना व जुन्या पिढीतील कापूस जिनिंग व्यावसायिक असतांना तालुक्यातील अनेक गोर गरीब व होतकरुंच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा पंचायत समिती चे माजी सदस्य प्रकाश मामा कोंडलवार,फर्निचर उद्योजक नागनाथ पाटील कोंडलवार,बालाजी पाटील कोंडलवार यांचे ते जेष्ठ बंधू होत. तसेच भोकर विकास महर्षी माजी सभापती,माजी सरपंच स्व.नारायण बाबागौड पाटील कोंडलवार व माजी सभापती तथा काँग्रेस पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांचे ते चुलत बंधू होत.त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले,२ मुली,सूना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून दि.१३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहनभूमी,भोकर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोंडलवार परिवाराच्या दु:खात सहभागी असून संपादक उत्तम बाबळे व परिवाराची स्व.मोहन पाटील कोंडलवार यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!