भोकर येथील प्रसिद्ध घड्याळ व्यापारी तथा मेकॅनिक मोहम्मद शफियोद्दीन यांचे दु:खद निधन
राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी चे भोकर तालुकाध्यक्ष मोहम्मद मझहरोदिन यांना पितृशोक..!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील शफी वॉच सेंटरचे मालक प्रसिद्ध घड्याळ व्यापारी तथा मेकॅनिक मोहम्मद शोफियोद्दीन यांचे अर्धांग वायूच्या दीर्घ आजाराने वयाच्या ७३ व्या वर्षी नेहरुनगर भोकर येथील राहत्या घरी दि.२८ नोव्हेंबर २०२४ ग्रुवार रोजी दुपारी दुःखद निधन झाले.
मोहम्मद शफिरोद्दीन हे भोकर येथील घड्याळ विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध जुने व्यापारी व घड्याळ दुरुस्ती करणारे कलानिपुण गुणवंत मेकॅनिक म्हणून त्यांची ख्याती होती.तसेच ते अतिशय मनमिळावू स्वभावाचे असल्याने तालुक्यासह अनेक ठिकाणाहून त्यांच्याकडे जुन्यातील जुनी व आधुनिक नुतन घड्याळ देखील दुरुस्त करण्यासाठी दुरवरुन लोक यायचे.ते भोकर येथील अदिबा गिफ्ट सेंटरचे मालक तथा राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष मोहम्मद मझहरोद्दीन यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात ३ मुले,५ मुली,जावई, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा पार्थीवावर दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ९:०० वाजता आम कब्रस्तान भोकर येथे दफनविधी करण्यात आला.यावेळी कुटूंबिय,नातेवाईक, मित्रगण, व्यापारी व विविध क्षेत्रातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.