३१ जानेवारी रोजी सेपक टाकरा नांदेड जिल्हा संघाची निवड चाचणी होणार
२३ व्या सब ज्युनिअर व २४ व्या ज्युनिअर राज्य सेपक टाकरा स्पर्धेसाठी या चाचणीतून जिल्हा संघ निवडले जाणार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : महाराष्ट्र राज्य सेपक टाकरा असोसिएशन यांच्या मान्यतेने व वर्धा जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन यांच्या वतीने दि.५ ते ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दरम्यान वर्धा येथे २३ व्या सब ज्युनिअर आणि २४ व्या ज्युनिअर संघांची महाराष्ट्र राज्य सेपक टाकरा स्पर्धा होणार आहे. सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्हा संघांची निवड करण्यात येणार आहे.त्या औचित्याने दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४:०० वाजता लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल,मंत्री नगर नांदेड येथे खेळाडूंची निवड चाचणी घेतली जाणार आहे.तरी अधिकाधिक खेळाडूंनी या चाचणीत सहभागी होऊन जिल्हा संघात आपले स्थान निश्चित करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवड चाचणीत सब ज्युनिअर संघासाठी १४ वर्षांखालील व ज्युनिअर संघासाठी १९ वर्षांखालील खेळाडू मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात.या चाचणीत निवड झालेल्या पात्र खेळाडूंचा नांदेड जिल्हा संघात समावेश करण्यात येणार आहे. तसेच या संघास वर्धा येथे दि.५ ते ७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य स्तरीय सेपक टाकरा स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.
नांदेड येथे होत असलेल्या निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी आपले चार पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड झेरॉक्स,जन्म दाखल्याची झेरॉक्स,बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे.तसेच निवड चाचणीसाठी बहुसंख्येने सहभागी व्हावे व खेळाडूंनी आपले नाव नोंदविण्यासाठी संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कुपटिकर,रविकुमार बकवाड यांच्याशी व ९९७५५७५२०६ आणि ८०८७८५७९४५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.