उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे विविध उपक्रमांचे आयोजन-राजेश्वर कदम
मोफत आरोग्य व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा गरिब गरजूंनी लाभ घ्यावा-इंजि.विश्वंभर पवार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर शाखा भोकरच्या वतीने दि.२२ ते २८ जुलै दरम्यान सलग ७ दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदरील सर्व उपक्रमांत बहुसंख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी केले आहे.तर दि.२२ जुलै रोजी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा,असे आवाहन उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर शाखा भोकर च्या वतीने दि.२२ ते २८ जुलै २०२४ दरम्यान सलग ७ दिवस भोकर शहरात विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी दिली असून सदरील कार्यक्रम व उपक्रम पुढील प्रमाणे आहेत.दि.२२ जुलै २०२४ रोजी डांगे फर्निचर मार्ट,शासकीय विश्रामगृहा शेजारी भोकर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील शिबीराचे उद्घाटक म्हणून उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार आणि पत्रकार मनोजसिंह चौहान यांची उपस्थिती राहणार आहे.तर दि.२३ जुलै २०२४ रोजी भारतीय संविधानाचे पुजन,वाचन व शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रतिंचे जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.दि.२४ जुलै २०२४ रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पत्रकार शेख लतिफ यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत.तर दि.२५ जुलै २०२४ रोजी अपंग व मुकबधीर विद्यालय भोकर येथील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते संपादक उत्तम बाबळे यांच्या हस्ते छत्र्या आणि खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.दि.२६ जुलै २०२४ रोजी ज्ञान संवर्धन विद्यालय,बोरगाव येथील विद्यार्थ्यांना पत्रकार गंगाधर पडवळे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.तर दि.२७ जुलै २०२४ रोजी ६५ वृक्ष रोपट्यांचे रोपन व संगोपन पत्रकार सुधांशू कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.तसेच दि. २८ जुलै २०२४ रोजी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून बस स्थानक भोकर येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.तरी उपरोक्त सर्व कार्यक्रम व उपक्रमांत बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर शाखा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग जिल्हा,तालुका व शहर शाखा भोकर च्या वतीने करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा – इंजि.विश्वंभर पवार
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्त दि.२२ जुलै २०२४ रोजी निर्मल हॉस्पिटल उमरी रोड भोकर येथे सकाळी १० ते ४ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात विविध रोगांची तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहेत.तसेच गरजे नुसार नेत्र शस्त्रक्रिया ही करण्यात येणार आहेत.याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरून दिल्या जाणार आहेत.तरी याचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार यांनी केले आहे.