उद्या वंचितचे सुरेश राठोड यांच्या प्रचारार्थ भोकर व अर्धापूर येथे सुजात आंबेडकरांची जाहीर सभा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : वंचित बहुजन आघाडीचे १६-नांदेड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. अविनाश भोसीकर व ८५-भोकर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश राठोड यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार,दि.१५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूल भोकर च्या मैदानावर आणि अर्धापूर येथील तासमा वळण रस्ता येथे स्टार प्रचारक तथा युवा नेते सुजात बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले असून या दोन्ही सभांना बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
होऊ घातलेल्या १६-नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडूक व राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची प्रचार मोहीम अंतिम टप्प्यात असून सर्व पक्ष अपक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा, कार्नर सभा आयोजित करुन मतदारांना साद घालत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे १६-नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ॲड.अविनाश भोसीकर व ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुरेश टिकाराम राठोड यांनी देखील प्रचारात वेग घेतला असून उपरोक्त दोघांच्याही प्रचारार्थ उद्या दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी जिल्हा परिषद हायस्कूल भोकर च्या मैदानावर आणि तामसा वळण रस्ता अर्धापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांचे आवाहन!
या जाहीर सभेला पक्षाचे स्टार प्रचारक तथा युवा नेते सुजात आंबेडकर व सर्वजीत बनसोड(राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी),नवनाथ वाघमारे(ओबीसी नेते),राजेश हत्तीअंबिरे पालमकर (जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड) यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.प्रथम भोकर येथील जाहीर सभा दुपारी १२:०० वाजता होईल व तद्नंतर अर्धापूर येथील जाहीर सभा होणार आहे. भोकर मतदार संघाचे उमेदवार सुरेश राठोड यांनी भोकर येथील त्यांच्या प्रचार कार्यालयात दि.१३ नोव्हेंबर २०२४ रोजी पत्रकार परिषद घेतली व उपरोक्त माहिती दिली आहे.नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक व भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष अपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असल्यामुळे प्रचार सभांचा धुमधडाका सुरु आहे.१६-नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एकूण १९,तर ८५-भोकर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांच्या प्रचार यंत्रणेने ग्रामीण व शहरी भागात प्रभावी यंत्रणा राबविली असून त्यास मतदारांचा ही चांगला प्रतिसाद मिळत आहे.तसेच उद्या दि.१५ नोव्हेंबर रोजी भोकर व अर्धापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सदरील दोन्ही सभांना मतदार बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उमेदवार सुरेश राठोड यांनी केले आहे.