मुस्लिम धर्मगुरू मौलाना सलमान अजहरी यांच्या अटकेचा भोकर मध्ये निषेध
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सुन्नी इस्लामिक रिसर्च स्कॉलर आणि मोटिवेशनल स्पिकर जामिया रियाजुल जन्नाह,अल-अमान एजुकेशन एंड वेलफेयर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक मुस्लिम धर्मगुरू मौलाना सलमान आजहरी यांनी जुनागढ येथील कार्यक्रमात केलेल्या भाषणात वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करुन गुजरात एटीएसने घाटकोपर मुंबई येथून त्यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेने मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली असून या अटकेच्या निषेधार्थ विविध पक्ष, सामाजिक संघटना व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने भोकर मध्ये दि.९ फेब्रुवारी रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच सदरील घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी व तहसिलदार भोकर यांच्या मार्फत राज्य आणि केंद्र शासनास निवेदन देण्यात आले आहे.त्या निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या असून त्यातील महत्वाची मागणी म्हणजे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे परत घेण्यात यावेत व त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी.सदरिल घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी व मागण्यांचे निवेदन देण्यासाठी एम.आय.एम.पार्टी तालुका भोकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग नांदेड व भोकर,आम आदमी पार्टी तालुका भोकर यांसह विविध सामाजिक संघटना व बहुसंख्य मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग घेतला होता.तसेच सदरील निवेदन एका जंबो शिष्टमंडळाने दिले असून त्यात मुफ्ती ईमरान,हाफिज आहाद,मौलाना अकबर,मौलाना अ.खादिर, हाफिज फारूक,हाफिज सद्दाम,एम.आय.एम.ग्रामीण नांदेड जिल्हाध्यक्ष बाबा खान पठाण, भोकर तालुकाध्यक्ष जुनेद पटेल,निजाम बाबा,शेख करीम करखेलीकर,शेख सुलेमान, इर्शाद खान,अहेमद भाई,जमील पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष शेख एजाज कुरेशी,राष्ट्रवादीचे भोकर शहराध्यक्ष फहिम पटेल,शेख जब्बार, आम आदमी पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष सय्यद अल्मास, शहराध्यक्ष शेख फारुख शेख मेहबूब,अब्दुल मोफेद अब्दुल सामी, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते म.ताजोद्दीन,शफी पटेल, मन्सूर खान पठाण कोळगावकर,फारूख जहागिरदार करखेलीकर,स.जब्बार यांसह आदींचा समावेश होता.