प्रा.लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करा
भोकर मध्ये ओबीसी नेते नामदेव आयलवाड व ओबीसी समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
भोकर (अंबुज प्रहार प्रतिनिधी) : ओबीसी भटक्या विमुक्त जाती या वंचित समूहाचे नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भोकर तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून ‘तो’ हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोरातील कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे,अशी मागणी ओबीसी नेते नामदेव आयलवाड व ओबीसी समन्वय समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भोकर उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या मार्फत दि.१ ऑक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुणे येथे दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी काही समाजकंटकांनी ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.तसेच त्यांच्याविषयी समाजमाध्यमांवर चुकीचे पोस्ट टाकून त्यांची बदनामी करण्यात आली व पुढील न्यायीक आंदोलन थांबविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. हे कृत्य अतिशय निषेधार्य असल्याने हे कृत्य करणाऱ्या ‘त्या’ समाज कंटकावर कठोरातील कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी,अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांच्या नेतृत्वाखाली भोकर मध्ये ओबीसी समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे.तसेच एका जब्बो शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन भोकर उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले असून सदरील निवेदनावर ओबीसी नेते नामदेव आयलवाड,नागोरावजी शेंडगे,बी.आर. पांचाळ,ॲड.शेखर कुंटे,माधव अमृतवाड,नंदकुमार कोसबतवार,सतीश देशमुख,दिनेश लोणे,सुरेश गुजेवाड,संजय देवकते,किशन सोळंके,रामा भालेराव,संजय शेंडगे,संदीप कानकाटे,संजय शेंडगे यांसह आदी ओबीसी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.