भोकर पोलीस ठोण्यातील सेवारत प्रल्हाद बाचेवाड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी झाली पदोन्नती
तर त्यांच्यासह जिल्ह्यातील २४ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदी करण्यात आली पदोन्नती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद नागन बाचेवाड यांची महाराष्ट्र राज्य गृह विभाग व पोलीस महासंचालक यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती केली असून त्यांच्या पदोन्नतीचे भोकर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी व अनेकांतून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये एकूण ३० वर्ष सेवा पुर्ण केलेले व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर किमान ०३ वर्ष सेवा पूर्ण केलेले आणि आश्वासित प्रगती योजनुसार पोलीस उप निरीक्षक संवर्ग पदाची वेतन श्रेणी घेत असलेल्या पोलीस अंमलदारांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्याचे पोलीस महासंचालक,अपर पोलीस महासंचालक व गृह विभागाने आदेश दिले होते.त्या आदेशाची अंमलबजावणी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नुकतीच केली असून जिल्ह्यातील २४ सेवारत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती केली आहे.यात भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद नागन बाचेवाड यांचा ही समावेश आहे.मौ.रिठ्ठा ता.भोकर चे भूमिपुत्र असलेले प्रल्हाद बाचेवाड यांची दि.१६ फेब्रुवारी १९९० मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी भरती झाली होती.दरम्यानच्या काळात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याने प्रथम जमादार व तद्नंतर भोकर पोलीस ठाण्यात सेवा कर्तव्य बजावतांना सन २०२१ मध्ये त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली होती.तर गृह विभागाच्या उपरोक्त निकषानुसार या पदावरुन त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे.त्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीचे भोकर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी,मित्रगण व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून पुढील सेवाकर्तव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.