कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी भोकर शहरात झाले पोलीस पथसंचलन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, रामनवमी च्या अनुषंगाने भोकर शहर व तालुक्यात कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी भोकर पोलीस विभागाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दि.१२ एप्रिल रोजी पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर शहरातील प्रमुख रस्त्याने पोलीस पथसंचलन करण्यात आले आहे.
उपरोक्त उल्लेखित निवडणूक,सण,उत्सवां दरम्यानच्या काळात कसलाही अनुचित प्रकार घडू नये,कायदा,शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि गैर कायदाचे काम करणाऱ्यांवर वचक रहावी यासाठी पोलीस हे सदैव नागरिकांच्या सेवेत तत्परतेने कर्तव्य बजावतील असा विश्वास नागरिकांना व्हावा यासाठी पोलीस बल दर्शविल्या जाते.त्याच अनुषंगाने दि.१२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०:४५ ते ११:५० वाजताच्या दरम्यान भोकर पोलीसांच्या वतीने भोकर पोलीस ठाण्यापासून शहरातील मिट्टी का शेर,सराफा काॅर्नर-म.गांधी चौक-कोळी गल्ली-म.गांधी नगर-आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक-बस स्थानक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते भोकर पोलीस ठाणे असे पोलीस पथसंचलन करण्यात आले.सदरील पथसंचलनात भोकर पोलीस ठाण्याचे.पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांसह ५ पोलीस अधिकारी व १७ पोलीस अमलदार,सी.आर.पी.एफ.चे १ पोलीस अधिकारी व ३१ पोलीस अमलदारांची तुकडी आणि गृहरक्षक दलाचे(होमगार्ड चे)२९ जवानांचा सहभाग होता.