वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असलेले १२ गोवंशधन भोकर पोलीसांनी पकडले
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : बोलेरो पिकप मालवाहू वाहनात दाटीवाटीने कोंबून छळ करत कत्तलीसाठी नेत असलेली १२ गोवंशधन किनी ता. भोकर शिवारात दि.१ जून रोजी भोकर पोलीसांनी पकडले असून त्या वाहनाच्या चालकासह अन्य एका विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्त्याबंदी कायदा लागू असून शेजारील तेलंगणा राज्यात तो लागू नसल्यामुळे छुप्या तस्करीच्या मार्गाने महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंशधन नेल्या जाते.याच प्रकारे दि.१ जून २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान एम. एच.२६ बी.ई.४५३४ क्रमांकाच्या मालवाहू बोलेरो पिकप<span;>मध्ये दाटीवाटीने कोंबून व दोरीने पाय बांधून छळ करत तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी १२ गोवंशधन घेऊन जात होते.हे वाहन भोकर तालुक्यातील किनी ते कासारपेठ तांडा रोडवर किनी शिवारातील वळण रस्त्यावर समोरुन येत असलेल्या एम.एच.३८ ए.डी. ४५४० क्रमांकाच्या कारला धडकले.सदरील कार मधील प्रवाश्यांनी त्या बोलोरो पिकपच्या चालकास व अन्य एकास पकडण्याचा प्रयत्न केला.परंतू गोवंशधन घेऊन जात असलेले बोलोरो पिकप वाहन तेथेच सोडून त्या दोघांनी पळ काढला.
ही माहिती भोकर पोलीसांना मिळताच बिट जमादार बालाजी लक्षटवार व पो.कॉ.नामदेव शिरोळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.परंतू कत्तलीसाठी गोवंशधन घेऊन जात असलेले ते दोघे पळ काढण्यात यशस्वी झाल्याने त्यांच्या हाती लागले नाहीत.सदरील बोलेरो पिकपमध्ये पाहिले असता दाटीवाटीने कोंबून,दोरीने पाय बांधून छळ करत ठेवलेले व कत्तलीसाठी नेत असलेले अंदाजे १५ ते २५ हजार रुपये किंमतीचे व दीड ते २ वर्षे वयाचे एकूण २ लाख २३ हजार रुपये किंमतीचे १२ गोवंशधन (गोरे)त्यांना त्यात मिळून आले.सदरील गोवंशधनासह अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे बोलोरो पिकप मालवाहू वाहन त्यांनी ताब्यात घेतले.यानंतर जमादार बालाजी लक्षटवार यांनी भोकर पोलीसात सदरील गुन्ह्याबाबद सरकार पक्षातर्फे रितसर फिर्याद दिली.यावरुन जमादार एम.व्ही.सय्यद यांनी बोलेरो पिकपचा अज्ञात चालक व अन्य एकजण अशा दोघांविरुद्ध गु.र.नं.१६४/२०२४ कलम २६९,२४७ भा.द.वि.सह कलम ५ अ (१),९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम,कलम ११ (१) ) घ (ड) (च) प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम व कलम ६६/१९२ मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तसेच २ लाख २३ हजार रुपये किंमतीचे १२ गोवंशधन व अंदाजे ५ लाख रुपये किंमतीची बोलोरो पिकप वाहन असा एकूण ७ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उपरोक्त गोवंशधन वाकद ता.भोकर येथील गोशाळेत सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहे.तर पो.नि. सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. केशव राठोड हे पुढील अधिक तपास करत आहेत.