भोकर कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना नॅनो युरिया,नॅनो डीएपी व स्प्रे पंपांचे झाले नियोजनबद्ध वाटप
गरजू लाभार्थी शेतकऱ्यांनी मानले कृषि विभागाचे आभार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र शासनाच्या व कृषि विभागाच्या वतीने भोकर तालुका कृषि विभाग अधिकारी कार्यालयास राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन उत्पादन वाढ आणि मुल्य साखळी विकास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ करिता गरजू शेतकऱ्यांसाठी नॅनो युरीया १३,३३० व नॅनो डीएपी १३,३३० आशा प्रकारे लिक्विड स्वरुपातील खताच्या एकूण २६,६६० बॉटल उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच याच योजनेंतर्गत १,२७४ बॅटरी चलीत स्प्रे पंप (फवारणी पंप) ही उपलब्ध झाली होती.उपरोक्त खते व स्प्रे पंपांचे भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने नुकतेच गरिबी,गरजू व होतकरू शेतकऱ्यांना वापप केले असून या लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाचे आणि कृषि अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी रामहरी मिसाळ, जयपाल पाईकराव व भोकर कृषि कार्यालयातील लिपिक श्रीमती रुक्मिणीताई तेलंगे यांनी सुनियोजनातून तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात ग्रस्त कुटुंब,अपंग शेतकरी तथा नैराश्य ग्रस्थ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करुन या सर्वांना प्रथम प्राधान्य देत नॅनो युरीया,नॅनो डीएपीचे व दि.१६ ऑगस्ट ते दि.३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान आणि दि.१८ सप्टेंबर ते दि.२४ सप्टेंबर २०२४ पर्यंत स्प्रे पंपांचे वाटप केले आहे.तसेच तालुक्यातील सर्व गावातील ऑनलाइन अर्ज केलेल्या उर्वरित शेतकरी बंधू-भगिनींना ही वाटप केले आहे.
तर शिल्लक राहिलेल खत तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी बंधू-भगिनींना समप्रमाणात कृषि सहाय्यक यांच्या मार्फत वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे तालुका कृषि अधिकारी यांनी सांगितले आहे.यामुळे भोकर तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील कापूस सोयाबीन इत्यादी पिकासाठी कृषि विभागामार्फत योग्य वेळी मिळालेल्या नॅनो युरिया व नॅनो डीएपी खताचा प्रथमच वापर करणार असून गरजू शेतकऱ्यांना अशा प्रकारे यातून अर्थ सहाय्य मिळाले असल्याने शेतकऱ्यांत आनंदी वातावरण तयार झाले आहे.हे करण्यासाठी प्रामाणिकपणे परिश्रम घेणाऱ्या कृषि विभागाच्या भंडारगृह व्यवस्थापक रुक्मिनीताई तेलंगे यांचे भोकर तालुक्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांनी कौतुक करत आभार मानले आहेत.
काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया…
राज्य शासनाने गेली दीड ते दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून अनुदान स्वरूपात काही योजना आणल्यात उदा. विविध बियाणे,खते,फवारणी स्प्रे पंप इत्यादी.कृषि विभाग कार्यालयाकडून होतकरू लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याच अनुषंगाने भोकर तालुका कृषि कार्यालयाने पहिल्यांदाच आम्हाला या वर्षी नॅनो डीएपी,नॅनो युरिया मोफत अनुदान स्वरूपात दिला आहे. त्यामुळे आमचे हजारो रुपये वाचले असून त्याबद्दल मी या कृषि विभाग अधिकारी व यंत्रनेचा आभारी आहे.
*देविदास राचेवाड,नांदा(शेतकरी)
या आधी शेतकऱ्यांपर्यंत कधी कधी अर्धे बी बियाणे, किटक नाशक,शेती उपयोगी साहित्य मिळत होते.तर कित्येकदा काहीच मिळत नव्हते.परंतू गेल्या दीड ते दोन वर्षांपासून नियमितपणे ग्रामीण भागातील सर्व गरजू लाभार्थी शेतकऱ्यांची यादी केली जात आहे व त्या यादीनुसार गावा गावात ग्रामपंचायत किंवा मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाच्या साह्याने सर्वांना सुचेना देऊन बोलावून घेतल्या जात आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते साहित्य पोहचवीण्याचे काम भोकर तालुका कृषि विभाग यंत्रणा करत आहे.त्यामुळे याचे सर्व श्रेय तालूका कृषि अधिकारी दिलीप जाधव,कृषि मंडळ अधिकारी राम हरी मिसाळ,जयपाल पाईकराव,कृषि सहाय्यक दिलीप काकडे,टी. डी.खुपसे,चंद्रशेखर ईर्लेवाड व सर्वच मंडळ अधिकारी,कृषि सहाय्यक आणि भांडार गृह व्यवस्थापक (लिपिक) रुक्मिणीताई तेलंगे यांना जात आहे.
*गोविंद गुजेवाड,नागापूर (शेतकरी )
तालुक्यातील प्रत्येक गावात कृषि योजनाची जनजागृती करून जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करायला लावून आपल्या परिसरातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनेअंतर्गत आलेले साहित्य पूरविण्याची चोख व्यवस्था भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून होत असून तालुक्यातील शेतकरी या यंत्रनेवर खुश आहेत.मी पण त्या सर्वांचे अभिनंदन करतो.
*मल्लेश,रहाटी(शेतकरी)