भोकर येथे उद्या युवा सेनेच्या संवाद सभेचे आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शिवसेना (शिंदे गट) अतर्गत नांदेड जिल्हा युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यात युवा संवाद दौऱ्यास प्रारंभ केला असून आजी खासदार तथा परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दि.२० ऑक्टोबर रोजी गणराज रिसोर्ट मंगल कार्यालय भोकर येथे युवा संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या युवा संवाद सभेस सर्व युवासैनिकांसह युवकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन आयोजकांनी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेना अंतर्गत नांदेड जिल्हा युवासेनेने सबंध जिल्ह्यात संवाद दौरा सुरू केला असून दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी गणराज रिसोर्ट मंगल कार्यालय भोकर येथे दुपारी ४:०० वाजता युवा संवाद सभेचे आयोजन केले आहे.या युवा संवाद सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंत भाऊ पाटील हे मार्गदर्शन करणार असून युवकांशी संवाद ही साधणार आहेत.तसेच या सभेस शिवसेना व युवासेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांसह अन्य काही मान्यवर ही उपस्थित राहून युवकांशी संवाद साधणार आहेत.तरी या संवाद सभेस युवासेनेचे पदाधिकारी,युवा सैनिक यांसह आदी युवकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजक तथा युवासेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विकास देशमुख,भोकर मतदार संघ समन्वयक अमोल पवार व स्वप्नील रेड्डी आणि भोकर तालुका युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.