Fri. Dec 20th, 2024

भोकर येथे जागतिक तंबाखू विरोधी सप्ताह निमित्त मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Spread the love

शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर च्या वतीने घेण्यात आले हे आरोग्य तपासणी शिबिर

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जागतिक तंबाखू विरोधी सप्ताह निमित्त दि.२८ मे २०२४ रोजी नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व मा. शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन व सप्ताह’ निमित्ताने पंचायत समिती अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालय भोकर च्या सभागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व समुपदेशन सत्र घेण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एम.जी. वाघमारे,एस.के.भुरेवाड,बलदवा,थडवे,सुधांशू कांबळे,नरवाडे, ग्रएम्बेल डेव्हिड यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.सपन्न झालेल्या शिबिरात येथील अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.
दंत शल्य चिकित्सक डॉ.मायादेवी नरवाडे यांनी मौखिक तपासणी केली.तर मौखिक व दंत आजार होऊ नयेत आणि झाल्यास काय काळजी घ्यावी,तसेच तंबाखूचे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले.याचबरोबर एन.सी.डी.समुपदेशक श्रीमती रेणूका भिसे यांनी संसर्गजन्य रोगाबद्दल समुपदेशन केले.तसेच आर.बी.एस.के.चे वैद्यकिय अधिकारी डॉ. व्यंकटेश टाकळकर,डॉ.अविनाश गुंडाळे,डॉ.ज्योती यन्नावार,डॉ.अपर्णा जोशी,आर.बी.एस.के.आरोग्य सेविका स्वाती सुवर्णकार, वत्सला धुमाळे व ज्योती काळे यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !