आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त भोकर येथे अभिवादन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
भोकर विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्यासह आदींनी केले अभिवादन!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय स्वातंत्र्य व सशस्त्र क्रांतीचे जनक,थोर समाजसुधारक ज्ञान सत्तेचे शिल्पकार आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या २३० व्या जयंती निमित्ताने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक भोकर येथील नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी दि.१४ नोव्हेंबर रोजी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष,जेष्ठ सामाजिक नेते तथा संपादक उत्तम बाबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच भोकर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी अनेकांच्या उपस्थितीत नाम फलक व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील भोकर येथील आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी संपादक उत्तम बाबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या तथा भोकर विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस व नाम फलकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यानंतर उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव नामदेव वाघमारे,तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख,अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे जिल्हा सचिव तथा भाजपा कार्यकर्ते चंद्रकांत बाबळे,परमेश्वर भालेराव,डॉ.राम नाईक,गंगाधर करंदीकर,बाळासाहेब टिकेकर,महेंद्र किनीकर, अशोक निळकंठे,शिवकुमार गाडेकर यांसह आदींनी ही अभिवादन केले.याप्रसंगी बहुसंख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.तसेच यानंतर मनसेचे उमेदवार साईप्रसाद जटालवार यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहून आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना अभिवादन केले.