Sun. Dec 22nd, 2024

ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आयोजकांच्या संपर्क दौऱ्यांनी घेतली गती

Spread the love

१८ ऑगस्ट रोजी भोकर येथे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मणराव होके व प्रा.नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे हा मेळावा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड जिल्हा सकल ओबीसी समन्वय समितीच्या वतीने भोकर येथे रविवार,दि.१८ ऑगस्ट २०२४ रोज मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मणराव हाके व प्रा. नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी येथील आयोजकांच्या तालुकानिहाय संपर्क दौऱ्यांनी गती घेतली आहे.
ओबीसींच्या आरक्षण कोट्यात मराठा समाजास समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लाऊन धरली आहे.याच अनुषंगाने राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला कसलीही हाणी न पोहचविता मराठा समाजास न्याय देऊ असे आश्वस्त केले आहे.परंतू सरकारने याबाबदची भुमिका स्पष्ट केली नसल्याने मूळ ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे असे सकल ओबीसी समाज बांधवांतून बोलल्या जात आहे.म्हणून ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यातील ओबीसी बांधवांनी वज्रमुठ आवळली आहे.यासाठीच ओबीसी नेते प्रा.लक्ष्मणराव हाके व प्रा.नवनाथ वाघमारे यांसह आदी ओबीसी नेत्यांचे राज्यात दौरे सुरु आहेत आणि जनजागृती सभा देखील होत आहेत.
नवा मोंढा भोकर जि.नांदेड येथे दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी नांदेड जिल्हा सकल ओबीसी आरक्षण बचाव समन्वय समितीच्या वतीने ओबीसी नेते प्रा.लक्ष्मणराव हाके व प्रा. नवनाथ वाघमारे यांसह आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ओबीसी आरक्षण बचाव’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.याविषयीची माहिती आयोजकांनी दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी एक पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धीस दिली आहे.तसेच सदरील मेळावाच्या यशस्वीतेसाठी आयोजक परिश्रम घेत असून बहुसंख्येने ओबीसी समाज बांधवांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे यासाठी जिल्ह्यातील तालुकानिहाय संपर्क दौरे सुरू केले आहेत.आयोजन समितीचे ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,बहुजन नेते नागनाथराव घिसेवाड, माधवराव अमृतवाड,सतिश देशमुख,ॲड.शेखर कुंटे,संदीप पाटील गौड,ॲड.परमेश्वर पांचाळ,सुरेशराव बिल्लेवाड,नागोराव शेंडगे,निळकंठ वर्षेवार,आनंदराव डांगे,संजय घंटलवार, सुभाषराव नाईक,विठ्ठल फुलारी,बी.आर.पांचाळ,आप्पाराव राठोड यांसह आदींचा या संपर्क दौऱ्यात समावेश असून यांनी किनवट,हिमायतनगर,हदगाव,उमरी येथील ओबीसी बांधवांशी संवाद साधला आहे.तसेच होऊ घातलेल्या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या सर्वांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !