Sat. Dec 21st, 2024

वंचित ब.आघाडीने भोकर विधानसभा मतदार संघातून रमेश राठोड यांची उमेदवारी केली जाहीर

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ करिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील अनेक मतदार संघातील उमेदवार निश्चित करण्यात आले असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी ८५-भोकर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून बंजारा समाजातील कार्यकर्ते रमेश राठोड यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्याचे लक्ष असलेल्या ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी बंजारा समाजातील रमेश राठोड यांची उमेदवारी जाहीर केली आहे.रमेश राठोड यांनी यापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.यामुळे येथील सर्व समाजातील मतदारांत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.तसेच या मतदार संघात बंजारा समाजाचे बहुसंख्य मतदार आहेत.त्यामुळे या निवडणुकीत त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सदरील मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढलेल्या नामदेव आयलवाड यांना १७ हजार ७८० मते मिळाली होती. ,तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या ॲड.श्रीजया चव्हाण यांच्याशी लढत असल्याने सक्षम उमेदवार दिला पाहिजे व रमेश राठोड यांना येथील बहुसंख्य मतदारांची यशस्वी साथ मिळू शकते,असा विश्वास असल्याने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाजातील रमेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे.असे राजकीय वर्तुळात चर्चील्या जात आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !