नवमतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी हा उपक्रम-खा.प्रतापराव चिखलीकर
भोकर येथे संपन्न झाले विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतले नमो नवमतदाता संमेलन…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : देशातील क्रांती व विकासात तरुणांचा मोठा हातभार आहे.परंतू अनेकवेळा देशाचे आधारस्तंभ असलेले तरुण तथा नवमतदार मतदानापासून वंचित राहतात.त्यांना प्रेरित करण्यासाठी व नवमतदाता मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून देशाचे पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नमो नवमतदाता संमेलनाचा देशव्यापी उपक्रम राबविल्या जात आहे आणि सर्व नवमतदात्यांनी आगामी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन भोकर येथे दि.२५ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या नमो नवमतदाता संमेलन प्रसंगी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपा व भाजपा युवा मोर्चा च्या वतीने दि.२५ जानेवारी २०२४ रोजी देशव्यापी नमो नवमतदाता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.याच अनुषंगाने माऊली मंगल कार्यालय,भोकर येथे सकाळी १०:०० वाजता भोकर विधानसभा संयोजक श्रीकांत पाटील किन्हाळकर व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नमो नवमतदाता संमेलन घेण्यात आले.या संमेलनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदार संघाचे प्रभारी पालक माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,भाजपाचे नवनियुक्त उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख,यांसह आदींची उपस्थिती होती.
यावेळी संमेलनस्थळी मोठ्या स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनोगताचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.तर माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांनी उपस्तितांना संबोधित केले.ते म्हणाले की,मागील दहा वर्षात विकासाभिमूख दुरदृष्टी असेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या व देशाच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या आणि त्या यशस्वीपणे राबविल्या.नव्हे तर ते सबका साथ, सबका विकाची ‘गॅरंटी’ देणारे विश्वनिय व्यक्तीमत्व ठरले आहेत.असे ही ते म्हणाले.तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना खा.प्रतापराव पाटील किन्हाळकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक राज्याच्या विधानसभेत व लोकसभेत पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी देखील प्रतिनिधित्व केलेच पाहिजे म्हणून त्यांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले आहे.तसेच मतदान योग्य वयीन तरुण तरुणींना देश विकासासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे म्हणून जनजागृतीचे देशव्यापी अनेक उपक्रम राबविले आहेत.हा उपक्रम देखील त्याचाच एक भाग असून येथील नव मतदाते हे भविष्यात भावी लोकप्रतिनिधी होऊ शकतात,असे ही ते म्हणाले.
सदरील संमेलनात श्रोता म्हणून श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर,कै.लक्ष्मराव घिसेवाड उच्च माध्यमिक विद्यालय भोकर,मंजळाबाई किन्हाळकर विद्यालय भोकर यांसह आदी विद्यालयांचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बहुसंख्येने उपस्थिती लावली.तर यावेळी भाजपा ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाट,जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई घिसेवाड-घुमनवाड,बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किनाळकर,माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश मामा कोंडलवार,जिल्हा सरचिटणीस बाळा साकळकर,जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर, जि.प. माजी सदस्य तथा ओबीसी विभाग जिल्हा सरचिटणीस दिवाकर रेड्डी सुरकुंठवार,चंद्रकांत नागमोड,माधव पाटील शिंदे, हरिदास हाके,हरिभाऊ चाटलवार,शिवा जाधव,माऊली पाटील, तेजस मालदोडे,सय्यद जाफर,संतोष बोईनवाड,लक्ष्मण तोटावाड,विजय प्रेमुलवाड,सुजित देशमुख,गोपीनाथ मुंतनेपवाड,रामदास थेरबनकर,लक्ष्मण राचेवाड,अनिल लामकानीकर,सुनिता ताई राचूटकर,करलताताई राठोड,सुनील शहा,अर्षद भाई यांसह आदींची उपस्थिती होती. सदरील संमेलन यशस्वीतेसाठी भाजपा,भाजपा युवा मोर्चा व आदी विभागांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.संमेलन समारोप प्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,डॉ.माधवराव किन्हाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड.कशोर देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व सर्वांनी पुढील सेवाकार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.संमेलनाचे सुत्रसंचालन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप सोनटक्के यांनी केले.तर उपस्थितांचे आभार भाजपा तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे यांनी मानले.
भाजपाचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष पदी ॲड.किशोर देशमुख यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल संपादक उत्तम बाबळे यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या…