Sun. Dec 22nd, 2024
Spread the love

विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी शासकीय नौकरीत ५ टक्के राखीव असलेल्या जागेतून या कराटे पट्टू मुलीची पुणे पोलीस दलात झाली आहे निवड

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील मंजूळाबाई किन्हाळकर शाळेत शिक्षण घेतलेल्या व कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या तालमित क्रीडा निपूण झालेल्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कराटे पट्टू कु.मोहिनी श्यामसुंदर माने हिची नुकतीच खेळाडूंसाठी राखीव असलेल्या ५ टक्के जागेतून पुणे पोलीस दलात महिला पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली असल्याने शाळेच्या वतीने दि.५ ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार करण्यात आला असून पुढील सेवाकर्तयासाठी तिला भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा जयंतराव पाटील वायफनकर यांच्या जन्मभूमितील अर्थातच मौ.वायफना ता.हदगाव येथील सामान्य शेतकरी कुटूंबातील कु.मोहिनी श्यामसुंदर माने या मुलीचे ७ वी ते १० पर्यंतचे शिक्षण मंजूळाबाई किन्हाळकर मुलींची शाळा भोकर येथे झाले आहे व इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथे झाले.याच दरम्यान तिने कराटे प्रशिक्षक तथा राज्य पंच बालाजी गाडेकर यांच्या कराटे क्तालासेसच्या तालिमेत व मार्गदर्शनाखाली कराटे,ऊशू,रग्बी यांसह आदी क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षण घेतले. तसेच लाठी,काठी,तलवारबाजी,भालाफेक यासह आदी क्रीडा प्रकारात ही ती निपुण आहे.कराटे व वुशू क्रीडा क्षेत्रात तिने शासन,शालेयस्तर व विविध संघटनांच्या वतीने आयोजित राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेऊन विजयश्रीचे मेडल्स प्राप्त केले आहेत.क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या कराटे क्लासेस मधील कु.मोहिनी माने ही कराटे क्षेत्रातील ब्लॅक बेल्ट व ब्राऊन बेल्ट प्राप्त कराटे पट्टू असून राज्य अकॅडमी सातारा येथे पुढील शिक्षण व मैदानी तयारी तिने केली आहे.
कु.मोहिनी माने हिची भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची मोठी इच्छा आहे.त्याच दिशेने तिने शारिरीक व मैदानी तयारी केलेली असतांनाच पुणे पोलीस दलात महिला पोलीस भरती निघाली आणि या भरतीसाठी तिने सहभाग घेतला असता पहिल्या प्रयत्नातच तिला यश आले असून विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी शासकीय नौकरीत राखीव असलेल्या ५ टक्के जागेतून तिची यात निवड झाली आहे.एकूणच मोठ्या जिद्दीने व परिश्रमाने तिने क्रीडा क्षेत्रातील मेडल्स,प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत.यातूनच त्याचे हे यशरुपी फळ तिला मिळाले आहे.ज्या शाळेतून तिने शिक्षण घेतले आहे व ज्या शाळेच्या मैदानावर बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्रात ती घडली आहे त्या शाळेस आणि क्रीडा क्लासेसाठी तिला मिळालेले हे यश म्हणजे अभिमानाची बाब आहे.सद्या नवरात्रोत्सव सुरु असून नारी शक्तीचा जागर व सन्मान करण्याचा हा कार्यकाळ असल्याच्या औचित्याने मंजूळाबाई किन्हाळकर मुलींची शाळा भोकर व क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या वतीने दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता शाळेच्या प्रांगणात नवदुर्गा कु.मोहिनी श्यामसुंदर माने हिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एन.पाटील या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून कु.मोहिनी माने हिचे काकाश्री प्रा.डॉ.व्यंकट माने,सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक उत्तम बाबळे यांची उपस्थिती होती.या सर्वांच्या उपस्थित व हस्ते कु.मोहिनी माने व तिचे वडील श्यामसुंदर माने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि पुढील सेवाकार्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांनी केले.तर प्रा. डॉ.व्यंकट माने, संपादक उत्तम बाबळे यांनी कु.मोहिनी माने ही सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याची बाब  मनोगतातून व्यक्त केली.अध्यक्षीय समारोप श्रीमती एस.एन. पाटील यांनी केला.पत्रकार सुधांशू कांबळे यांनी सुत्रसंचालन केले.तर सर्व उपस्थितांचे आभार शिक्षक दिनेश मांजरमकर यांनी मानले.यावेळी शाळेतील शिक्षक विठ्ठल कुमरे,पदमवार, मोरे,शिंदे,शेख यांसह विद्यार्थीनीं व कराटे क्लासेसच्या बहुसंख्य खेळाडूंची उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !