Wed. Apr 9th, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत…जुन्या कार्यकर्त्यांना ही सन्मानाची वागणूक द्यावी-आ.प्रतापराव चिखलीकर

Spread the love

राष्ट्रवादी च्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची नियुक्ती झाल्याने भोकर मध्ये आ. प्रतापराव पाटील चिखलीकर व त्यांचे भव्य स्वागत!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पक्ष वाढीच्या दृष्टीकोनातून पदाधिकाऱ्यांना पदनियुक्त्या ही दिल्या जात आहेत.याच अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे दि.८ मार्च रोजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व नुतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचे भोकर मध्ये भव्य स्वागत करण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या खंबीर नेतृत्वास स्विकारुन आणि लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यातील अनेक दिग्गजांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करत आहेत.पक्ष बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने पक्ष प्रवेश केलेल्या नुतन व जुन्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,कार्याध्यक्ष खा.प्रफुल्लभाई पटेल,प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनिल मगरे यांच्या मान्यतेने व आदेशानुसार पदनियुक्त्या दिल्या जात आहेत. माजी आमदार अविनाश घाटे,मा.आ.मोहन हंबर्डे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,नांदेड महानगराध्यक्ष जिवन पाटील घोगरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशालीताई चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर,प्रदेश सदस्य मोहम्मद खान पठाण,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनंदाताई जोगदंड यांसह आदींच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष वरीष्ठाच्या मान्यतेने व आदेशानुसार दि.७ मार्च २०२५ रोजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील संपर्क कार्यालयात आणि त्यांच्या शुभहस्ते काही कार्यकर्त्यांना पदनियुक्ती पत्र देण्यात आले.
पदनियुक्ती देण्यात आलेल्याची नावे व पद पुढील प्रमाणे आहेत. व्यंकटराव पाटील गोजेगावकर(प्रदेश उपाध्यक्ष),प्रविण पाटील चिखलीकर (प्रदेश सरचिटणीस),मुक्तेश्वर केशवराव धोंडगे(प्रदेश संघटक सचिव),दादाराव शावजी ढगे(प्रदेश सचिव),बाळासाहेब किशनराव पाटील रावणगावकर(नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष),सौ. वैशालीताई स्वप्नील चव्हाण(राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा),श्रीमती चित्राताई दिगंबरराव लुंगारे(प्रदेश सरचिटणीस-राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी) यांसह आदींना पदनियुक्ती पत्र देण्यात आले असून उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करुन पुढील पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत…जुन्या कार्यकर्त्यांना ही सन्मानाची वागणूक द्यावी-आ.प्रतापराव चिखलीकर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्यावर पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेऊन पदावरुन निलंबित करण्यात आले होते.तेंव्हा पासून नांदेड उत्तर चे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि आणि पशूसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,भोकर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला होता‌.बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या पक्ष संघटन कार्याची दखल घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे व वरीष्ठांनी बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना रिक्त असलेल्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्याचे ठरविले. तसेच त्यांच्या मान्यतेने व आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली.सदरील नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन केले गेले.याच अनुषंगाने दि.८ मार्च २०२५ रोजी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे ऋण व्यक्त करण्यास्तव व बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या अभिनंदनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे दोघांचेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका भोकर च्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

स्वागतानंतर माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांच्या संपर्क कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आयोजित महिला सन्मान कार्यक्रमास आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनाश घाटे,प्रविण पाटील चिखलीकर,भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,यांसह आदींनी हजेरी लावली. यावेळी नुतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी आपल्या मनोगतातून पक्षश्रेष्ठींसह आ.प्रतापराव पाटील चिखलीकर व सर्व कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त केले.तर आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करुन शुभेच्छा देण्यात आल्या.तसचे उपस्थितांना संबोधित करताना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, नुतन कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनी कसलाही गैर समज करुन घेऊ नये व नुतन कार्यकर्त्यांनी देखील गैर समज होईल असे वागू नये आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून पक्ष टिकलेला असल्याने त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. पक्ष बळखटीकरणात विरोधकांचे कोणतेही आव्हान उभे केले तरी ते आव्हान पेलण्याची ताकद तुम्हा सर्वात असून मी देखील सर्व शक्ती निशी आपल्या सोबत राहणार आहे,अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बिल्लेवाड यांनी केले.तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिवाजी पाटील लगळूदकर यांनी मानले.यावेळी महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !