Fri. Apr 18th, 2025

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या अध्यक्षपदी प्रा.आर.के.कदम

Spread the love

तर उपाध्यक्षपदी बालाजी कदम पाटील व सचिवपदी गंगाधर पडवळे यांची निवड

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : जनसामांन्याना आपल्या लेखणीतून न्याय हक्क मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार प्रा.आर.के. कदम,उपाध्यक्षपदी बालाजी कदम पाटील व सचिवपदी गंगाधर पडवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्यासह सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
देश,राज्य पातळीवर सेवारत असलेल्या व शोषित,वंचित, पीडितांसह पत्रकार आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या भोकर तालुका शाखेच्या कार्यकारिणीचा वार्षिक कार्यकाळ पुर्ण झाल्याने नुतन कार्यकारिणी गठित करण्यासाठी दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार बांधवांची एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली.तसेच वार्षीक आढावा घेण्यात येऊन सर्वानुमते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर ची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे…अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार प्रा.आर.के.कदम,उपाध्यक्ष-बालाजी कदम पाटील,सचिव-गंगाधर पडवळे,कोषाध्यक्ष-विशाल जाधव, सहकोषाध्य-विनय दुर्केवार,सहसचिव-संभाजी कदम,संघटकपदी-गजानन गाडेकर,जेष्ठ सल्लागार-अंबादास बोयावार,तर सदस्यपदी-भाविन शेठ,साईनाथ बंडोड,आकाश राठोड,निळकंठ पडवळे, श्रीकांत बाबळे यांसह आदींचा यात समावेश आहे.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे संपादक उत्तम बाबळे यांनी स्वागत व अभिनंदन केले असून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गोपाळराव लाड,जिल्हाध्यक्ष संपादक शंकरसिंह ठाकुर,जिल्हा सचिव संपादक मारोती निकारे यांसह आदींनी सर्वांना पुढील सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !