वलांडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या!
नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी गृहमंत्र्यांकडे केली मागणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : मौजे वलांडी ता.देवणी जि.लातूर येथील हिंदू खाटीक समाजातील ६ वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागाणी नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मौजे वलांडी ता.देवणी येथील या निंदणीय घटनेचा नांदेड जिल्हा सकल अनुसूचित जातीतील व मानवतावादी न्यायप्रिय संघटनांच्या वतीने दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तीव्र जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निंदणीय घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी व खालीलप्रमाणे कठोर कार्यवाहीचे निर्देश द्यावेत.तसेच गरीब असहाय्य पिडीत मुलीस व तिच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाअधिकारी नांदेड यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे.त्या मागण्या पुढील प्रमाणे…
या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवून गुन्हे प्रकरणातील आरोपीस फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवावे,पिडीत मुलीच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे,या घटनेतील पिडीत मुलीस शासनाच्या मनोधैर्य योजनेतून व समाजकल्याण विभागामार्फतची शासनाची मदत तातडीने मिळवून द्यावी, यांसह आदी न्यायीक मागण्या करण्यात आल्या आहेत.तर सदरील मागण्या मान्य न झाल्यास विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,परमेश्वर बंडेवार,अॅड.बी.एम. गायकवाड,एन.डी.रोडे,शिवाजी नुरूंदे,चंपतराव हातागळे, नागेशभाऊ तादलापूरकर,मर्हारी तोटरे,सत्यशोधक समाज संघाचे दत्ता तुमवाड,ओबीसी समन्वय समतीचे नेते एस.जी. माचनवार,नंदकुमार कोसबतवार,मानवहित लोकशाही पार्टीचे मालोजी वाघमारे,आकाश सोनटक्के, हिंदू खाटीक समाज संघटनेचे बालाजी सौदागर,अंबादास सांडवे,मिथुन रत्नपारखे, अॅड.विजय रत्नपारखे,डिगांबर धाकपाडे,गणेश रत्नपारखे,दत्ता धाकपाडे,गंगुलाल नामतकर,गणेश घोरपडे,बहुजन समाज पार्टीचे सुनील डोंगरे,क्रांती आंदोलनाचे उत्तमराव वाघमारे, गोपीनाथ सूर्यवंशी,उत्तमराव देगावकर यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी दिला आहे.