Fri. Apr 11th, 2025

नांदेड च्या सुधा शिंदे व श्रद्धा कुलुपवाड यांची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धे साठी झाली निवड

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मस्तुना साहेब संगरुर,पंजाब राज्य येथे होणाऱ्या ३० व्या सबज्युनिअर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी कु.सुधा हरी शिंदे व श्रद्धा कुलुपवाड या दोघींची महाराष्ट्र संघात निवड झाली असून त्यांच्या या यशस्वी निवडीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

मस्तुना साहेब संगरुर पंजाब राज्य येथे ३० व्या सबज्युनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचे दि.२७ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.सदरील स्पर्धेत महाराष्ट्र संघ सहभागी होणार असून संघातील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी दि.२० ते २५ मार्च २०२५ दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय भातकुली, अमरावती येथे प्रशिक्षण शिबीर होणार आहे.तर दि.२६ मार्च २०२५ रोजी प्रशिक्षण पुर्ण झालेला हा महाराष्ट्राचा संघ संगरुर पंजाब येथे जाण्यासाठी रवाना होणार आहे.
या संघात मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय भोकर,जि. नांदेड येथील खेळाडू विद्यार्थीनी तथा बेसबॉल खेळाचे मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांची शिष्या कु.सुधा हरी शिंदे व कु. श्रद्धा कुलुपवाड,नांदेड या दोन गुणवंत खेळाडूंची या संघातील सहभागी खेळाडू म्हणून हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेड चे अध्यक्ष प्रशांत तिकडे पाटील,उपाध्यक्ष नरसिंग आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे.याचा सार्थ अभिमान असल्याने त्यांच्या निवडीबदल महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन सचिव राजेंद्रजी इखनकर,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन तंत्रिका समिती चेअरमन अशोकजी सरोदे व हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेड चे सचिव आनंदा कांबळे,मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर व उपरोक्त संघटने तर्फे या दोन्ही गुणवंत खेळाडूंचा अभिनंदनीय जाहीर सत्कार करण्यात आला  असून पुढील स्पर्धेतील यशासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू कु.सुधा शिंदे व प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांचा करण्यात आला सत्कार
बेसबॉल क्रीडा क्षेत्रात मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंतील आता पर्यंत दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या कु.सुधा हरी शिंदे या खेळाडूची नुकतीच महाराष्ट्र संघातील सहभागी खेळाडू म्हणून निवड झाली आहे.ही खेळाडू मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय,भोकर जि.नांदेड ची विद्यार्थिनी असल्याने शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.त्यामुळे शाळेतर्फे तिचे व प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या सत्काराचे आयोजन दि.१९ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एन.पाटील,शाळेचे शिक्षक दिनेश मांजरमकर,क्रीडा शिक्षक विठ्ठल कुमरे यांसह आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खेळाडू कु.सुधा शिंदे, प्रशिक्षक बालाजी गाडेकर व तिचे वडील हरी शिंदे यांचा यथोचित सत्कार केला.तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील यशासाठी सर्वांनी भरभरून हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !