समाज भुषण सतिश कावडे यांना नागपूरचा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ‘जीवनव्रती पुरस्कार’ प्रदान
अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी,नागपूर चे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांनी केला हा पुरस्कार प्रदान
अंबुज प्रहार प्रतिनिधी
हदगाव : सामाजिक,शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीमत्वास अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी,नागपूर या सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.समाज भुषण सतिश कावडे यांच्या कार्याची दखल घेऊन उपरोक्त संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे घोषित केले होते.याच अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांनी दि.२९ नोव्हेंबर रोजी त्यांना अण्णा भाऊ साठे ‘जीवनव्रती पुरस्कार’ प्रदान करुन सन्माननिय केले आहे.
अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे यांनी सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,वैचारिक,सरकारी नौकरी व विविध सेवाभावी क्षेत्रात समाजनिष्ठ चळवळीतून केलेले कार्य हे स्पृहनीय,प्रेरणादायी आणि गौरवास्पद ठरणारे आहे.त्यांनी आयुष्य पणाला लावून सातत्याने सेवाकार्यासाठी त्याग केला आहे.त्यांचा समाज उत्थानाचा ध्यास सर्व उपेक्षित,शोषित व वंचितांना सदैव सामाजीक,शैक्षणिक सांस्कृतिक,साहित्यिक, वैचारिक कृतिशीलतेच्या उंबरठ्यावर नेणारा ठरलेला आहे. त्यांची ही जीवनदायी दृष्टी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांच्या महाजागराच्या कार्याचा नंदादिप समाजात सतत तेवत ठेवणारी आहे.त्यांच्या आयुषयाचा हा अनमोल ठेवा समाज परविर्तनाच्या उंबरठ्यावर पायठेवणाऱ्या चळवळीतील प्रत्येक व्यक्तिला दिशादर्शक ठरणारा आहे.यामुळे त्यांच्या कर्तव्याची दखल अनेक सेवाभावींनी व राज्य सरकारने देखील घेतलेली असून आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
याच बरोबर त्यांनी सहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे अजरामर साहित्य व संस्कृतीवर आधारित विचारांचा महाजागर समाजात पेरण्यासाठी व घरोघरी पोहोचविण्याचा ध्यास घेवून जीवन समर्पित केलेले आहे.त्यांच्या सपर्पित कर्तुत्वाची दखल अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी, नागपूर या सामाजिक सेवाभावी संस्थेने देखील घेतलेली असून समाज कार्याचा हा वसा व समर्पित व्रतस्त कृतिशीलतेचा विचारयज्ञ सातत्याने चालू ठेवणाऱ्या समाज भुषण सतिश कावडे या सेवाभावी व्यक्तीमत्त्वाचा गौरव व्हावा आणि त्यांचे हे व्रतस्त समाज जीवन सामाजासाठी गौरवास्पद ठरावे म्हणून उपरोक्त संस्थेने सहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ‘जीवनव्रती पुरस्कार’ २०२४ देऊन सन्मानित करण्याचे घोषित केले होते. दि.११ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या नागपूर येथील ३ रे राज्यस्तरीय साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य व संस्कृती संमेलनात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार होता.परंतू त्याच महिन्यात राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने त्यांना साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार देऊन मुंबई येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात आले होते.त्यामुळे समाज भुषण सतिश कावडे यांना उपरोक्त पुरस्कार घेण्यासाठी नागपूरला जाता येऊ शकले नाही.त्यामुळे त्यांचा तो पुरस्कार नागपूर च्या उपरोक्त संस्थेकडे प्रलंबित होता.याच अनुषंगाने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी,नागपूर चे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांनी दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी हदगाव येथे सहकुटूंब येऊन समाज भुषण सतिश कावडे यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ‘जीवनव्रती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.शासकी विश्रामगृह हदगाव येथे संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.रेणूताई वानखेडे,सामाजिक कार्यकर्त्या सुधाताई बावणे(नागपूर) व लसाकमचे राज्य महासचिव तथा शिज्ञण विस्तार अधिकारी गुणवंत काळे,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,जिल्हाध्यक्ष नागेश भाऊ तादलापूरकर,अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे गजानन गाडेकर यांसह आदींची उपस्थिती होती.तसेच साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांचे नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने उपस्थितांनी यथोचित सत्कार व स्वागत केले.तर समाज भुषण सतिश कावडे यांना उपरोक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याने त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.