आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांचा भोकर मध्ये छायाचित्रकारांनी केला भव्य सत्कार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचीत आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांचे विधानसभेत संविधानिक शपथ घेतल्यानंतर भोकर शहरातील प्रथम आगमन झाल्याच्या निमित्ताने छायाचित्रकार अवि दास मित्रमंडळ व फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने छायाचित्रकार बांधवांनी त्यांचा भव्य सत्कार केला व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
८५-भोकर विधानसभा मतदार संघाच्या लाडक्या व लोकप्रिय आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी विधानसभेत संविधानिक शपथ घेतल्यानंतर त्यांचे प्रथमच भोकर शहरात आगमन झाले.यानिमित्ताने छायाचित्रकार अवि दास मित्रमंडळ व फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन महाराष्ट्र राज्य तालुका शाखा भोकर च्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन श्री बालाजी मंदिर,नवा मोंढा भोकर येथे करण्यात आले होते.आ. ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी प्रथम अवि दास यांच्या फोटो प्रतिष्ठानला सदिच्छा भेट दिली व यानंतर अवि दास मित्रमंडळ आणि फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन महाराष्ट्र राज्य या आम्हा छायाचित्रकारांच्या संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील जनसेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,उपाध्यक्ष सुधाकर देशमुख,सचिव मारोती आरटवाड,कोषाध्यक्ष महेश नारलावार,संघटक मनोहर बट्टेवाड, समन्वयक ज्ञानदेव पुरी,सल्लागार बालाजी कोटूरवार,सदस्य अशोक देशमुख,अवि दास,श्रीकांत बाबळे,बाळू पिंगलवाड, साहेबराव डोंगरे यांसह आदी छायाचित्रकार बांधवांची उपस्थिती होती.तसेच भाजपा पदाधिकाऱ्यासह आदींची ही उपस्थिती होती.
याप्रसंगी संघटनेच्या वतीने आमदार महोदयांना एक अभिनंदन पत्र व छायाचित्रकारांच्या प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले. याचबरोबर कोतवाल बांधवांनी ही त्याचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.तर संपादक उत्तम बाबळे यांनी आ.ॲड. श्रीजया चव्हाण यांना छायाचित्रकारांच्या समस्या अवगत करून दिल्या व त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल असे आश्वस्त त्यांनी केले.