लोहा येथील जेष्ठ नागरिक सौ.इंदिराबाई ताडेराव यांचे दु:खद निधन!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
हदगाव : तालुक्यातील लोहा येथील रहिवासी जेष्ठ नागरिक सौ. इंदिराबाई लक्ष्मणराव ताडेराव(७६) यांचे दि.२३ मार्च २०२५ रोजी रात्री ११:५५ वाजताच्या दरम्यान राहत्या घरी दु:खद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या मेंदू विकार व अर्धांग वायूने आजारी होत्या.त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,मुलगी,सूना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थीवावर दि.२४ मार्च २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता लोहा ता.हदगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.ताडेराव परिवाराच्या दु:खात समस्त बाबळे लाठकर परिवार सहभागी असून स्व.सौ.इंदिराबाई ताडेराव या सामाजिक कार्यकर्ते संपादक उत्तम बाबळे यांच्या जेष्ठ भगिनी होत. स्व.सौ.इंदिराबाई ताडेराव यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!