लिटल लिग राज्यस्तरीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील दोन संघाची झाली निवड

भोकर येथे लिटल लीग बेसबॉल जिल्हा संघ निवड चाचणी यशस्वीरित्या संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महात्मा गांधी विद्यालय दहिवडी,जि.सातारा येथे दि.१५ ते १७ मार्च २०२५ यादरम्यान लिटल लिग राज्यस्तरीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोगट १३ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाकरीता खेळाडूंची निवड चाचणी दि.९ मार्च २०२५ रोजी मंजुळाबाई किन्हाळकर विद्यालय,भोकर जि.नांदेड या शाळेच्या मैदानावर घेण्यात आली.संपन्न झालेल्या निवड चाचणीतून दोन संघ निवडण्यात आले असून हे संघ उपरोक्त स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेड च्या वतीने लिटल लिग बेसबॉल राज्य स्तरीय स्पर्धे करिता खेळाडूंची निवड चाचणी भोकर येथे घेण्यात आली.यात वयोगट १३ वर्षाखालील खेळाडू मुले व मुली यांची निवड चाचणी संपन्न झाली.यावेळी बेसबॉलचे जेष्ठ खेळाडू सिद्धार्थ कसबे,प्रेम वारुळे,महिला पंच कु.सलोनी सुरदसे,मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांसह आदींनी खेळाडूंची निवड चाचणी घेतली.निवड चाचणीतून मुले व मुली सहभागी असलेल्या दोन संघांची निवड करण्यात आली.निवडण्यात आलेले हे दोन नांदेड जिल्हा संघ दहिवडी जि.सातारा येथे दि.१५ ते १७ मार्च २०२५ रोजी दरम्यान होत असलेल्या लिटल लिग राज्यस्तरीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
संपन्न झालेल्या यशस्वी निवड चाचणीतून निवडलेल्या व नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन संघ व खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे आहेत.पहिल्या संघातील खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे…१) जिग्नेश तिरमकदार, २)रोहन कसबे,३)यश कोवे,४)श्रेयस वानोळे, ५)असलम शेख,६)आयुष वाघमारे,७)अथर्व गोरटकर,८)साईप्रसाद कुलुपवाड,९)कु.साक्षी हनवते,१०)कु.सोनाक्षी हनवते,११)कोमल राठोड,१२)कु.विशाखा सुभानजोड.तर दुसऱ्या संघातील खेळाडू… १)अजय राठोड,२)कु.श्वेता जाधव,३)वेदांत चौधरी,४)अमित पपुलवाड,५)शौर्य दमकोंडवार,६)तुषार देशमुख,७)सानवी भंडारवाड,८) शैलेश टोपलवाड,९)बुशरा शेख,१०)श्रेयश पिन्नलवार, ११)क्रिश राठोड,११)कु.विश्वबौध्दी सवते यांचा समावेश आहे.विशेष बाब म्हणजे भोकर तालुक्यातील १० शाळेतील २४ खेळाडू उपरोक्त स्पर्धेत सहभागी होणार आहेत.निवडण्यात आलेल्या खेळाडू व संघाचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील यशासाठी हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेड चे जिल्हाध्यक्ष प्रशांत अण्णा तिडके पाटील,उपाध्यक्ष नरसिंग अण्णा आठवले,हौशी बेसबॉल असोसिएशन चे सचिव आनंदा कांबळे,मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांसह आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.