काळ्या फिती लावून वक्फ दुरुस्ती विधेयकाचा भोकर मध्ये केला निषेध

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ च्या माध्यामूत केंद्र सरकार मुस्लिमांच्या हक्काची पायमल्ली करत आहे.यामुळे सदरील विधेयकाचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्डाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत आहे.तसेच या विधेयकाचा सर्व मुस्लिमांनी निषेध करावा असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भोकर शहरातील मक्का मस्जिद येथे जमियते उलैमा-ए-हिंद चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मौलाना मुबीन खान इनामदार यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ मार्च रोजी नमाजे जुमा नंतर काळ्या फिती लावून या विधेयकाचा निषेध करण्यात आला आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) ने वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी,जुमातुल विदा रोजी काळ्या फिती बांधून मूक निषेध करण्याचे आवाहन केले होते.तसेच म्हटले होते की,देशातील मुस्लिमांना प्रस्तावित कायद्याचा विरोध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारच्या नमाजला उपस्थित राहताना उजव्या हातावर काळ्या फिती बांधाव्यात.या आवाहनास भोकर शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे.