Sat. Dec 21st, 2024

कु.सानिका धनवे आली आहे ‘काता’ क्रीडा प्रकारात राज्यातून प्रथम

Spread the love

नांदेड येथे खुली महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्हा डिफेन्स कराटे असोसियेशन, एम.आय.टी.अकॅडमी अँड ज्यूमियर कॉलेज वडेपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाणे येथील एम.आय.टी. अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज वडेपूरी,नांदेड येथे रविवार,दि.२६ मे २०२४ रोजी राज्य स्तरीय खुली महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत कु.सानिका विश्वनाथ धनवे हिने ‘काता’ या क्रीडा प्रकारात राज्यात प्रथम तर कराटे फाईट क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तिला मिळालेल्या या यशाचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

राज्यस्तरीय खुली महाराष्ट्र कराटे स्पर्धेच्या संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या अध्यक्षा सेन्साई अनुराधा शिंदे ह्या होत्या,तर उद्घघाटक म्हणून स्पर्धेचे आयोजक नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक सिहान एकनाथ पाटील होते.तसेच यावेळी नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनचे समन्वयक सेन्साई नफिस शेख, जपानीस कराटे असोसिएशन ऑफ इंडिया,नांदेडचे मुख्य प्रशिक्षण बालाजी उधाने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातून शेकडो स्पर्धाकांनी सहभाग नोंदवाला होता.या स्पर्धेतील सिनियर गटात कु.सानिका विश्वनाथ धनवे हिने ‘काता’ या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवीत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले.यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ते गोल्ड मेडल देऊन कु.सानिका धनवेचा यथोचित सत्कार करण्यात आला. जपानीस कराटे असोसिएशन ऑफ इंडिया नांदेडचे मुख्य प्रशिक्षक बालाजी उधाने,नांदेड यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून कु.सानिका धनवे ही प्रशिक्षण घेत आहे.तर सद्या ब्राऊन बेल्ट साठी सराव करीत आहे.

अशा प्रकारे विविध क्रीडा क्षेत्रात बहुगुणी असलेल्या खेळाडू कु.सानिका विश्वनाथ धनवे हिने ‘काता’ या क्रीडा प्रकारात राज्यात प्रथम (गोल्ड मेडल ) तर कराटे फाईट या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल) मिळविले असून होऊ घातलेल्या आगामी देश पातळी वरील क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.या यशा बद्दल तिची आई अश्विनी धनवे,भाऊ बलवीर धनवे,मामा किरण राव,पत्रकार सिद्धार्थ जाधव यांसह अनेक नातेवाईक व क्रीडा प्रेमींतून कौतुकाच्या वर्षावासह अभिनंदन केले जात आहे.तर पुढील स्पर्धेत तिला यश मिळावे यासाठी अंबुज प्रहार न्युज लाईव्ह च्या वतीने देखील मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !