Sun. Dec 22nd, 2024

क्रांतिकारी देशप्रेम शिकविणारे पहिले क्रांतीविद्यापीठ क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी निर्माण केले-प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे

Spread the love

मौ.डोरली ता.हदगाव येथे आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा जयंती सोहळा व संविधान गौरव परिषद उत्साहात संपन्न 

अंबुज प्रहार प्रतिनिधी
तामसा : पेशवाईत एका विशिष्ट समाजाच्या तरुणांनाच शरीर बळकटीसाठी व्यायामशाळा व शैक्षणिक शाळा  उपलब्ध होत्या आणि इतरांना तेथे बंदी होती.अशा प्रतिकुल परिस्थितीत सन १८२२ मध्ये अस्पृश्य,बहुजन व अन्य उपेक्षित समाज घटकांतील तरुणांचे मन,मेंदू,मनगट व शरीर बळकट करण्यासह क्रांतिकारी देशप्रेम तथा शस्त्रविद्या शिकविणारी व्यायाम शाळा(तालिम) आणि शिक्षण देणारे पहिले क्रांतिविद्यापीठ आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी निर्माण केले.त्यामुळेच हजारो देशभक्त व क्रांतिकारकांचे ते क्रांतिगुरु ठरले आहेत,असे प्रतिपादन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.मौ.डोरली ता.हदगाव येथे दि.२९ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा २३० वा जयंती सोहळा व संविधान गौरव परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
हजारो क्रांतिकारकांचे गुरुवर्य,शिक्षण क्रांतिचे प्रणेते,थोर समाज सुधारक आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या २३० वा जयंती सोहळा व संविधान गौरव परिषद मौ. डोरली ता.हदगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष समाज भुषण सतिश कावडे हे होते.तर उद्घाटक म्हणून लसाकमचे राज्य महासचिव तथा शिक्षण विस्तार अधिकारी गुणवंत काळे व प्रमुख वक्ते म्हणून अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांची उपस्थिती होती.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे(नागपूर),भिमा टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके,लहुजी टायगर फोर्स चे संस्थापक अध्यक्ष वि.मा.शिरसाट,नागेश भाऊ तादलापूरकर,रेणूताई वानखेडे, सुधाताई बावणे (नागपूर),अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे गजानन गाडेकर,संतोष हातावेगळे,राम गाडेकर यांसह आदींची उपस्थिती होती.साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे व आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.तर सायंकाळी उद्घाटक गुणवंत काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांच्या पुजनाने जयंती सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उद्घाटनपर प्रास्ताविक गुणवंत काळे यांनी केले.तर जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे,दादासाहेब शेळके,पुरुषोत्तम गायकवाड यांसह आदींनी सोहळ्यास अनुसरून मार्गदर्शन केले व अध्यक्षिय समारोप समाज भुषण सतिश कावडे यांनी केला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना संपादक उत्तम बाबळे म्हणाले की,पेशवाईत मनूस्मृतीला तत्कालीन प्रतिसंविधान मानून मनूस्मृतील आध्याय,संस्कृत श्लोक,तथा धार्मिक शिक्षण दिले जायचे.तसेच या शाळेत येण्यासाठी अस्पृश्य,बहुजन,उपेक्षित व वंचितांना बंदी होती.तसेच शाळेबाहेरुन यांनी केवळ ते ऐकले तरी कठोर शिक्षा दिली जायची.तत्कालीन प्रतिसंविधान प्रचलित ही शिक्षण पद्धती आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी मोडीत काढली व जनाईच्या मळ्यात पहिली विज्ञानवादी व परिवर्तनवादी शाळा उघडली.परंतू ती शाळा अधिक काळ टिकू शकली नाही.कारण ख्रिश्चनिकरणाच्या नावाखाली पेशवाईने व सनातन्यांनी ती शाळा मोडीत काढली.यामुळे आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे हे खचले नाहीत तर अस्पृश्य,महिला व बहुजनांच्या शिक्षणासाठी सन १८४७-४८ मध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी उघडलेल्या शाळेच्या पहिल्या प्रचार सभेचे अध्यक्ष राहून शिक्षण क्रांतीला आणि फुले दांपत्याला संरक्षण दिले.यामुळे तत्कालीन प्रतिसंविधानिक शिक्षण पद्धती मोडीत काढणारे आधुनिक काळातील पहिले महापुरुष आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे हे ठरले आहेत,असे ही ते म्हणाले.

सदरील सोहळ्याचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ज्ञानेश्वर सिरसाट यांनी केले.तर उपस्थितांचे आभार लहुजी टायगर फोर्सचे युवा नेते रोहितभाऊ सिरसाट यांनी मानले.तसेच सोहळ्याच्या सांगतेनंतर प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजि‌. पवन महाराज दवंडे यांचा प्रबोधनपर गितांचा कार्यक्रम संपन्न झाला.उपरोक्त सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष नारायण बोखारे,लक्ष्मण खानजोडे,अंकुश सिरसाट व सर्व जयंती मंडळ सदस्य आणि गावकरी मौ.डोरली यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !