Wed. Dec 18th, 2024

आ.ॲड.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते केले नांदा बु. ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन पत्र प्रदान

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.नांदा (बु) ग्रामपंचायतीला आयएसओ २०२५ मानांकन मिळाले असून भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सदरील ग्रामपंचायतीच्या संबंधितांना नुकतेच ते मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीबद्दल आयएसओ मानांकन मिळणे हा महत्त्वाचा दर्जा मिळाल्याचे समजले जाते. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीची कार्यपद्धती व शासनाच्या विविध योजना राबवून गावासाठी करण्यात आलेले काम यासाठी सदर मानांकन देण्यात येते.भोकर तालुक्यातील नांदा बु.ग्रामपंचायतीला या कार्यासाठी आयएसओ मानांकन २०२५ मिळाले नुकतेच मिळाले आहे.भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदा बु.ग्रामपंचायतीच्या संबंधितांना ते मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.यावेळी भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधवराव केंद्रे,ग्रामपंचायत अधिकारी संघाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र काळे,भोकर विधानसभा प्रभारी भगवानराव दंडवे,उपसभापती बालाजी श्यानमवाड, कल्याणे,स्मिता बुरकुले,मकदुम,कनोजवार,शैलेश काळे, विश्वनाथ माहोरे,गुलाब वडजे यांसह ची उपस्थिती होती. तर सदरील ग्रामपंचायतीस हे महत्त्वपुर्ण व गौरवाचे मानांकन मिळाल्याने सर्व संबंधितांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !