जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा सन्मान
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जल जीवन मिशन चे राष्ट्रीय प्रशिक्षक तथा पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी देशाच्या विविध राज्यात स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जलजीवन मिशन या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून पाणी आणि स्वच्छता यांची जनजागृती जनमानसात केली. तसेच पत्रकारिता क्षेत्रात अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी बजावल्याबद्दल आहे.त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेण्यात येऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा यथोचित सन्मान केला व पुढील सेवाभावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.