Mon. Mar 31st, 2025

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने जांभळी येथे महिलांचे आरोग्य तपासणीचे विशेष शिबीर संपन्न

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी ता.भोकर च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी मौ.जांभळी ता.भोकर येथे महिलांच्या आरोग्य तपासणीचे विशेष शिबीर संपन्न झाले.

नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी व उप केंद्र पांडूरणा अंतर्गत असलेल्या दुर्गम भागातील मौ.जांभळी येथे महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.जगदीश राठोड,आरोग्य सेविका जाधव, आरोग्य सेवक साईनाथ यांनी सदरील आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन डॉ.संगीता देशमुख यांच्या हस्ते केले.

या आरोग्य शिबिरामध्ये विशेषतः महिला व किशोरवयीन मुली, गरोदर माता आणि स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.ही विशेष तपासणी स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवानी राठोड व डॉ.पूनम पोटजाळे यांनी केली.तर स्त्री समुदाय आरोग्य अधिकारी यांनी एन.सी.डी.स्क्रिनिंग केले.तसेच या शिबिरामध्ये एचआयव्ही तपासणी,सिकल सेल तपासणी,हिमोग्लोबिन तपासणी,रक्त तपासणी यांसह आदी चाचण्या करण्यात आल्या. या विशेष आयोजनामध्ये  आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढणे, आभा कार्ड काढणे,किसान कार्ड काढणे इत्यादी ऑनलाईन सेवा देण्यात आल्या.तसेच शिबिरात १०० दिवसीय क्षय रोग मोहीमेंतर्गत क्षय रोग रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली.तसेच कुष्ठ रोग रुग्णांची ही तपासणी करण्यात आली.यानंतर डॉ.संगिता देशमुख यांच्या हस्ते काहींना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले.तर या शिबिरात ३० जणांची सिकल सेल तपासणी करण्यात आली व ३५ जणांचे आयुष्मान कार्ड ही काढण्यात आले.

हे शिबिर आयोजनात व यशस्वी करण्यासाठी भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव,प्रा.आरोग्य कें.भोसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवानी राठोड, पांडूरणा चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.जगदीश राठोड,डॉ.राजपूत,आरोग्य सहाय्यक शेख रहीम,अंजली मेंडके,तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा वर्कर व अंगणवाडी ताई यांसह आदींनी परिश्रम घेतले.याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या यशस्वी नियोजनात सहकार्य केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !