Wed. Apr 9th, 2025

जलसंधारण जनजागृतीसाठी ‘वॉटर शेड यात्रा’ दरम्यान कृषि विभाग व टीजीआय तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील १४० प्रकल्प क्षेत्रांमधील १ हजार ५३० गावांपर्यंत ‘वॉटर शेड यात्रा’ पोहचणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत मनिघालेली ही ‘पाणलोट रथयात्रा’ भोकर तालुक्यातील मौ.हाडोळी,मौ.कामणगाव येथे पोहचली असता अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा राज्याच्या ३० जिल्ह्यांतील १४० प्रकल्प क्षेत्रांमधील १५३० गावांपर्यंत पोहोचणार आहे.भोकर तालुक्यातील हाडोली व कामणगाव येथे ही यात्रा पोहचली असता भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी रथाचे स्वागत केले.तसेच पाणलोट रथाचे पूजन केले.त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात झाली.प्रभात फेरीत गावकऱ्यांनी जलसंवर्धनाच्या घोषणा दिल्या. टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक तसेच शालेय विध्यार्थी फेरी या पद्धतीने जनजागृती करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय जलसंधारण अधिकारी दयासागर गायकवाड,हाडोली व कामणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.संपन्न झालेल्या जनजागृती सभेचे प्रास्ताविक कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.या दरम्यान “दि गोदावरी ईनीशीयेटीव्ह” यांच्या मार्फत  ‘चालता बोलता’ या सत्रातून जलसंधारणाविषयी जनजागृती साठी प्रश्न मंजूषा घेऊन तांत्रिक माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांसाठी,मंथन स्पर्धा आयोजित करण्यात आली.यात प्रश्नमंजूषा आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले.’पाणलोट योद्धा’ आणि ‘धारणीताई’ पुरस्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.
याचबरोबर उपस्थितांनी मृद व जलसंधारणाची शपथ घेतली. वृक्षारोपण व श्रमदानातून ग्रामस्थांनी पाणलोट विकासासाठी योगदान दिले.तर कृषि सहाय्यक एल.एन.डहाळे,जे.जी.जाधव, विलास काकडे,शंतनू सितावर,बी.टी.एम.बोईनवाड साहेब,डी. डब्ल्यूटी प्रशांत पाटील,कानकदांदे,मामीडवार,दिलीप काकडे यांसह आदी कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !