चिंचाळा येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करा

चिंचाळा(प.भो.)ता.भोकर येथील राष्ट्रवादी चे सिद्धेश्वर ढवळे पाटील यांनी केली मागणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.चिंचाळा(प.भो.)येथे करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदरील कामाची चौकशी करुन अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारा विरुद्ध कारवाई करण्यात यावी,अशी मागणी चिंचाळा येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस सिद्धेश्वर ढवळे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
मौ.चिचाळा(प.भो.)ता.भोकर या गावातील जि.प. प्राथमिक शाळेपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत काही दिवसांपूर्वी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम केले आहे.ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले असल्यामुळे अवघ्या चार दिवसातच त्या पुर्ण सिमेंट काँक्रीट रस्त्यावर चिरा व भेगा पडत आहेत.असे निदर्शनास आल्याने सदरील रस्ता अगदी काही दिवसांतच निकामी व नष्ट होऊन जाईल.यातून खर्च झालेल्या शासकीय निधीचा अपव्यय होईल.कंत्राटदाराने सदरील काम करतांना मनमानी केली असून गावातील नागरिकांचे तो काहीही ऐकत नाही.त्यामुळे आपल्या कार्यालयातील सक्षम अधिकाऱ्यां मार्फत नागरिकांसमक्ष चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी अशी मागणी चिंचाळा येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस सिद्धेश्वर ढवळे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.तसेच चौकशी करून कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे.