विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकर मध्ये पोलीसांनी केले पथसंचलन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने कायदा,शांतता व सुरक्षितता या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सज्ज असल्याचे दर्शविण्यासाठी दि.३० ऑक्टोबर रोजी भोकर शहरातील मुख्य रस्त्याने पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे पथसंचलन करण्यात आले.
सदरील पथसंचलनात बीएसएफ चे १० अधिकारी व ४२ जवान,भोकर पोलीस ठाण्यातील सेवारत ३ पोलीस अधिकारी व १५ पोलीस अंमलदार यांसह आदींचा समावेश होता.