भोकर मध्ये उद्या बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर विधानसभा मतदारसंघाचे बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी भोकर मध्ये भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आयोजकांनी केले आहे.
भोकर विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात बहुजन विचाराचा ठसा उमटविणारे व प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटणारे आणि सर्वसामान्यांच्या मदतीला सदैव धाऊन जाणारे बहुजन नेते नागनाथराव घिसेवाड यांच्या वाढदिवसा निमित्त दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी कै.लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल,किनवट रोड भोकर येथे सकाळी ११:०० नागनाथराव घिसेवाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मंगल प्रसंगी ज्येष्ठ नेते राम चौधरी मुदखेड,डॉ.उत्तम जाधव भोकर,ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,नगरसेवक रिझवान भाई अर्धापूर यांची उपस्थिती राहणार आहे.तर सकाळी ९:०० वाजता शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुग्णांना फळे वाटप,मूक बधिर व अंध विद्यालय भोकर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,कै.घिसेवाड विद्यालय येथे वृक्षारोपण व विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा साजरा होणार आहे.तसेच या सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांसह स्नेहिजण,मित्रगण, कार्यकर्ते व नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.तरी या सोहळ्यास भोकर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन नागनाथराव घिसेवाड मित्र मंडळ भोकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.