व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये ‘विविध स्पर्धा परीक्षा व इतर कलेमधील प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा’ त्यांच्या पालकांसमवेत सत्कार समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.
सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन,दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या ‘सायन्स व मॅथ ऑलिम्पियाड’ परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह ‘गोल्ड मेडल’ प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.या सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष नामदेव कार्लेकर, कासराळीचे सरपंच शंकर गायकवाड व शाळेचे प्राचार्य विरभद्र विभुते,सौ.रुचिरा बेटकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये गोल्डमेडल प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा हार व पुष्पगुच्छ देत मिठाई भरवून विषेश सत्कार व कौतुक करण्यात आले.यामध्ये प्रतीक्षा उपासे, शिवराज बनसोडे,अनुष्का जाधव,सार्थक कौटकर,निरव गायकवाड, साक्षी कर्नेवाड,श्रेया माने,रुपेश क्षीरसागर,अंतरा डुकरे,राजवीर काशीद व सर्वेश गुंडले आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. यासोबतच शाकुंतल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या विभागस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये व्यंकटेश्वराच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषक मिळवल्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचा देखील विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सोबतच सायन्स टीचर धनंजय गायकवाड व मॅथ टीचर रूचिरा बेटकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
व्यंकटेश्वराच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी आपली गुणवत्ता सिद्ध करत विशेष प्राविण्य प्राप्त केले.त्यामुळे शाळा नवीन असूनही,कमी विद्यार्थी असताना देखील शाळा आपल्या शिक्षकांच्या अथक मेहनतीमुळे व पालकांच्या सहकार्याने आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध करू शकलो. पुढेही असेच यश संपादन करत राहू असे मत प्राचार्य विरभद्र विभुते यांनी आपल्या प्रस्ताविकेत सांगितले.तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे यासाठी वसतीगृहाची व्यवस्था केली असून भविष्यात सर्व सोयी सुविधा पूरवत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष नामदेव कार्लेकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.
या सत्कार समारंभाने आम्ही भारावून गेलो व शाळा घेत असलेल्या मेहनतीवर आम्ही समाधानी असल्याचे पालकांनी सांगितले.सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश मोरे व आभार प्रदर्शन रुचिरा बेटकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय गायकवाड,भाग्यश्री नमले,अंजूषा कपाळे,जान्हवी जोंधळे,मेहफुजा मिस यांच्यासह माधव सूर्यकार यांनी परिश्रम घेतले.