Mon. Mar 31st, 2025

गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भोकर च्या ‘श्री शाहू विद्यालयाची’ झाली निवड

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर जि.नांदेड ची गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झाली असून संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी ही बाब अतिशय आनंदाची व अभिमानाची आहे.त्यामुळे शाळेच्या सर्व संबंधितांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

विशेष म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२’ मध्ये शाळेला विभागीय पातळीवर पारितोषिक मिळाले आहे.ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई येथे तत्कालीन मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक आदींच्या हस्ते शाळेला सदरील पारितोषिक देण्यात आले आहे.
तर जळगाव येथील ‘महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन’ ही एक सुविख्यात संस्था असून या संस्थेतर्फे ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा’ ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.या स्पर्धेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून यंदा श्री शाहू विद्यालय भोकर ची अंतिम फेरीत निवड झाली असून या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी नामांकन मिळणे ही बाब भूषणावह आहे.त्या अनुषंगाने श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.गोविंदराव लामकाणीकर,सचिव शिरिष देशमुख गोरठेकर,संचालक कैलास देशमुख गोरठेकर,प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर,संस्थेचे विविध पदाधिकारी,पत्रकार बांधव यांसह समाजाच्या विविध स्तरांतून ‘श्री शाहू परिवारावर’ अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !