नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ५,शिवसेनेचे ३ व रा.काँ.पा.चा १ उमेदवार विजयी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल दि.२३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत.रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट मतदारसंघातून भाजपचे भिमराव केराम,हदगाव मतदार संघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर,भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण,नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर,नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके बोंढारकर,लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर,नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार,देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ.तुषार राठोड हे विजयी झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला ५ जागा,शिवसेनेला ३,तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला १ अशा एकुण ९ जागा निवडून आल्या आहेत.तर विधानसभे सोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.रविंद्र चव्हाण हे विजयी झाले आहेत.झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
८३-किनवट- आ.भिमराव केराम
८३-किनवट विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार भिमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)महाविकास आघाडीचे जाधव प्रदीप नाईक यांचा ५६३६ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.या निवडणुकीमध्ये भिमराव रामजी केराम यांना ९२८५६ मते मिळाली,तर जाधव प्रदीप नाईक यांना ८७२२० मते मिळाली आहेत.यामध्ये उमेदवार जाधव सचिन माधवराव (नाईक) यांना ५५११ तीसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावरील अशोक संभाजीराव ढोले यांना ५३११ मते मिळाली आहेत.
८४-हदगाव-बाबूराव कदम कोहळीकर
८४-हदगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा ३००६७ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.या निवडणुकीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना ११३२४५मते मिळाली,तर माधवराव पाटील जवळगावकर यांना ८३१७८ मते मिळाली आहेत.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप आला राठोड यांना ११४०९ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली,तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार देवसरकर माधव दादाराव यांना १२७६ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
८५-भोकर- ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण
८५-भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांचा ५०५५१ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.या निवडणुकीमध्ये ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांना १३३१८७ मते मिळाली,तर तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांना ८२६३६ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड यांना ८८७२ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.तर बहुजन समाज पार्टीचे कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते यांना १६६४ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
८६-नांदेड उत्तर-बालाजी कल्याणकर
८६-नांदेड उत्तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अब्दुल सत्तार अ.गफुर यांचा ३५०२ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर यांना ८३१८४ मते मिळाली,तर अब्दुल सत्तार अ.गफुर यांना ७९६८२ मते मिळाली आहेत.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत विराज इंगोले यांना २४२६६ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगीता विठ्ठल पाटील यांना २२७०६ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
८७-नांदेड दक्षिण -आनंद शंकर तिडके बोंढारकर
८७-नांदेड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंद शंकर तिडके बोंढारकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे मोहनराव हंबर्डे यांचा २१३२ एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये आनंद शंकर तिडके यांना ६०४४५ मते मिळाली,तर मोहनराव हंबर्डे यांना ५८३१३ मते मिळाली आहेत.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुक अहमद यांना ३३८४१ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.तर दिलीप कंदकुर्ते यांना १७१७० चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
८८-लोहा-प्रतापराव पाटील चिखलीकर
८८-लोहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ रावसाहेब पवार यांचा १०९७३ एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ७२७५० मते मिळाली,तर एकनाथ रावसाहेब पवार यांना ६१७७७ मते मिळाली आहेत.जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार चंद्रसेन ईश्वरराव पाटील (सुरनर) यांना २९१९४ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.तर प्रा.मनोहर बाबाराव धोंडे यांना २०३०२ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
८९-नायगाव-राजेश संभाजीराव पवार
८९–नायगाव विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेश संभाजीराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा ४७६२९ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.या निवडणुकीमध्ये राजेश संभाजीराव पवार यांना १२९१९२ मते मिळाली.तर डॉ.मीनल पाटील खतगावकर यांना ८१५६ मते मिळाली आहेत.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.माधव संभाजीराव विभुते यांना १६०४३ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली,तर प्रहार जनशक्ती पार्टीचे गजानन शंकरराव चव्हाण यांना २१४४ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
९०-देगलूर-जितेश रावसाहेब अंतापूरकर
९०-देगलूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांचा ४२९९९ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.या निवडणुकीमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना १०७८४१ मते मिळाली,तर निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांना ६४८४२ मते मिळाली आहेत.प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार साबणे सुभाष पिराजीराव यांना १५९१९ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली,तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देगलुरकर सुशिलकुमार विठ्ठलराव यांना ५४०३ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
९१-मुखेड-डॉ.तुषार राठोड
९१-मुखेड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार तुषार राठोड यांनी राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा ३७७८४ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.या निवडणुकीमध्ये डॉ.तुषार राठोड यांना ९८२१३ मते मिळाली, तर हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना ६०४२९ मते मिळाली आहेत.बालाजी नामदेव खतगावकर यांना ४८२३५ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली,तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रावसाहेब दिगांबरराव पाटिल यांना ४७०० चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.