Sat. Dec 21st, 2024

कर्तव्यदक्ष पो.उप.नि.दिगांबर पाटील यांची धर्माबाद येथे बदली

Spread the love

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीस विभागातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५२ पोलीस उपनिरीक्षक यांच्या करण्यात आल्या प्रशासकीय बदल्या

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : आगामी लोकसभा -२०२४ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारशी नुसार पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५२ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदलल्यांचे आदेश पत्र दि.११ जानेवारी रोजी काढले असून यात भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावणारे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटील यांची भोकर येथून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धर्माबाद जी.नांदेड येथे बदली करण्यात आल्याचा समावेश आहे.

देशाच्या लोकसभा निवडणूकीचा बिगुल लवकरच वाजणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महसूल, पोलीस व विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्व विभागांना सुचविले आहे.त्याच सुचनेनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिनियम क्र.२२ च्या कलम २ ची सुधारणा महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम २०१५ मधील सुधारीत तरतुदीनुसार व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिनियम क्र.२२ (एन) (२) (इ) नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करुन नांदेड जिल्हा पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारशी नुसार लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील जवळपास २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५२ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात येत असल्याचे आदेश पत्र दि.११ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केले आहेत. तसेच बदली करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांना पदग्रहण अवधी देय नसल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्या नुतन बदलीच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारावा व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेशित करण्यात आले आहे.
सदरील बदली आदेशात भोकर पोलीस ठाणे येथे सेवारत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पांडूरंग पाटील यांचा समावेश आहे.पो.उप.नि. दिगांबर पाटील यांनी गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावली असल्याने त्यांना पोलीस विभागाने सेवापदक देऊन गौरविले आहे.अशा कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटील यांची भोकर पोलीस ठाण्यात दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली.येत्या फेब्रुवारीत भोकर येथील सेवेचे त्यांचे ३ वर्ष पुर्ण होत आहेत.दरम्यानच्या काळात २०२२ अखेर त्यांची अर्धापूर जि.नांदेड येथे बदली करण्यात आली होती. परंतू भोकर तालुका हा तेलंगणा राज्य सीमेवरील महाराष्ट्रातील मोठा तालुका असून येथील कामाची व्याप्ती व गुन्ह्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना येथून सोडण्यात आले नाही. कर्तव्यकठोर व न्यायप्रिय व्यक्तीमत्व असलेल्या पो.उप.नि. दिगांबर पाटील यांनी भोकर येथे दरम्यानच्या काळात अनेक गुन्हे उघडकीस आणले आणि अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यांच्या उत्कृष्ट कर्तव्यसेवेचा कार्यकाळ येथील अनेकांच्या स्मरणात राहणार आहे.त्यांना पुढील सेवाकार्यासाठी संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने खुप खुप हार्दिक शुभेच्छा!बदली करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नावे व बदली करण्यात आलेले ठिकाण दर्शविणारे आदेशपत्र पुढील प्रमाणे…

 

बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे व बदली करण्यात आलेले ठिकाण दर्शविणारे आदेशपत्र पुढील प्रमाणे…

 


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !