Sat. Apr 26th, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच समानतेची फळे चाखता आली-न्यायाधीश मुजीब शेख

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धीमता व स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध केले आणि प्रचंड दरी असलेल्या व्यवस्थेत समाजाला समानतेच्या मार्गावर आणले.त्यामुळेच आज आपण जी समानतेची फळे चाखत आहोत,याचे सर्व श्रेय पुजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते.असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा जि.अहिल्यानगर चे वरीष्ठ जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी व्यक्त केले.भोकर न्यायालयात वकील व अभिवक्ता संघाच्या वतीने दि.२५ एप्रिल २०२५ रोजी आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते‌.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर चे जिल्हा न्यायाधीश वाय.एम.एच.खरादी हे होते.तर दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश ए.पी.कराड,दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश डी.डी.माने,दुसरे सहाय्यक दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश आर.एस.इरले,निवृत्त ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ ॲड.रमेश राजूरकर,ॲड.सतीश कुंटे,ॲड.एल.डी.देशपांडे,ॲड.बळवंत कुलकर्णी,ॲड.संदीप कुंभेकर,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.एस.एन. कादरी,ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक उत्तम बाबळे,पत्रकार राजेश वाघमारे,सिद्धार्थ जाधव,विशाल जाधव, साईनाथ बंडोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना न्यायमूर्ती मुजीब एस.शेख पुढे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर येथे सन्मानाने चांगले आयुष्य जगू शकले असते, परंतु त्यांनी सामाजिक समता निर्माण करण्यासाठी अनेक लढे उभारले आणि ते यशस्वीही केले.पाण्यासाठी महाड येथील चवदार तळ्याचे आंदोलन त्यांनी केले.यावेळी महाडच्या न्यायालयात त्यांनी स्वतः वकील म्हणून हा खटला लढला व यात ते जिंकले ही. या न्यायालयात न्यायाधीश म्हणून मी कर्तव्य सेवा बजावली.यामुळे मला त्या ऐतिहासिक खटल्याचा निकाल हाताळता आला हे मी माझे भाग्य समजतो.यातून त्यांची समता आणि समानतेची उच्च विचारसरणी मला अभ्यासता आली.त्या विचारांचे अनुयायी म्हणून त्यांनी सांगितलेल्या विचारानुसार आपण ही समाजातील गरीब, शोषित,पिडीत,वंचित,उपेक्षित लोकांची सेवा केली पाहिजे.तरच यातून जयंती असो का पुण्यतिथी साजरी करतांना या प्रकारे सर्वांना आदरांजली वाहता येईल,असेही ते म्हणाले.जिल्हा न्यायाधीश वाय.एम.एच.खरादी यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हटले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष सर्वांना माहीत असून जयंती साजरी करताना त्यांचे विचार आत्मसात करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर या कार्यक्रमाची पार्श्वभूमी ॲड.आर के कदम यांनी प्रास्ताविकातून मांडली.तसेच या कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन ॲड.दिनेश हणमंते यांनी केले व उपस्थितांचे आभार वकील संघाचे अध्यक्ष ॲड.एस.एन.कादरी यांनी मानले.सदरील कार्यक्रमास ॲड.मंगेश पेदे,ॲड.प्रदीप लोखंडे,ॲड.अनिल येरेकर, ॲड.सिद्धार्थ कदम,ॲड.रवींद्र खाडे,ॲड.शिवाजी कदम,ॲड.परमेश्वर पांचाळ,ॲड.बी.एस.सूर्यवंशी,ॲड.बालाजी वाघमारे,ॲड.मुजाहेद शेख,ॲड.सुरज पाशा शेख,ॲड.लक्ष्मीकांत मोरे,ॲड.अल्तमश शेख, ॲड.के.जे.राठोड,ॲड.गिरीश देशपांडे,ॲड.अतुल राठोड,ॲड. बालाजी सूर्यवंशी,ॲड.दीपक भातलवंडे,ॲड.बी.ए.कावळे,ॲड. अक्षय पांचाळ,ॲड.प्रकाश मेंडके,ॲड.विशाल दंडवे,ॲड.सुजाता कांबळे,ॲड.मनीषा सोनकांबळे,ॲड.गायकवाड,ॲड.वनिता राठोड, ॲड.सुहासिनी कदम,आबेद शेख यांसह आदींजण उपस्थित राहून यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !