Fri. Dec 20th, 2024

शंकरसिंह ठाकुर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नादेड : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड तर्फे दिल्या जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार दैनिक वीर शिरोमणी चे संपादक शंकरसिंह ठाकुर यांना जाहीर करण्यात आला असून निवड समितीचे प्रमुख डॉ.पुंडलिक नामवाड,डॉ.मनोज राऊत,पत्रकार सुशील कुमार भवरे यांनी ही माहिती दिली आहे.सदरील पुरस्काराने संपादक शंकरसिंह ठाकुर यांना सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा,ता.हिमायतनगर,जिल्हा नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून गेल्या सहा वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार दिले जातात.पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोनारी फाटा ता.हिमायतनगर येथे दिला जाणार आहे.दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी धम्म परिषद होणार असून या बौद्ध धम्म परिषदेमध्ये शंकरसिंह ठाकूर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शंकरसिंह ठाकुर यांच्या सामाजिक व न्यायीक पत्रकारितेची दखल घेऊन आयोजकांनी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे घोषित केले असून धम्म परिषदेचे उद्घाटक शिवश्री कामाजी पवार(राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ),धम्म परिषदेचे अध्यक्ष आमदार माधवराव पाटील जळगावकर,स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक भाई शेठ हिमायतनगरकर,निमंत्रक कैलास भाऊ माने,माजी सभापती जोगेंद्र नरवाडे कामारीकर,निवेदक उत्तम कानिंदे,मार्गदर्शक सिने अभिनेते डॉ.प्रमोद आंबाळकर, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी भीमराव कावळे,अभियंता मिलिंद गायकवाड,अभियंता भरत कुमार कानिंदे,संयोजन समितीचे अध्यक्ष तथा वृत वारसदार चे संपादक त्रिरत्न कुमार भवरे कामारीकर,महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे,बापूराव जमदाडे, रमेश नार्लेवाड, शंकर दादा गायकवाड,डॉक्टर कैलास कानींदे, पत्रकार जयभीम पाटील,मनोज शिंदे,हमीद खान पठाण यांसह आदींच्या उपस्थितीत सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.शंकरसिंह ठाकुर यांना उपरोक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने अनेक स्नेहिजणांसह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील सामाजिक कार्य व पत्रकारितेसाठी अनेकांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संपादक उत्तम बाबळे यांच्या वतीने देखील संपादक शंकरसिंह ठाकुर यांचे अगदी मनापासून खुप खुप हार्दिक अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !