जि.प.प्रा.शाळा रुईच्या बाल वैज्ञानिकांचा सृजनाविष्कार म्हणजे भविष्यातील मोठी नांदी होय!-सूर्यकांत बाचे
अंबाळाचे मुख्याध्यापक सुरेश दंडवते यांनी घेतला या शाळेचा अधिभार व सुरळीत झाला शाळेचा कार्यभार…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
हदगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई (धा.) तालुका हदगाव येथील विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान विषयातील विविध प्रकारच्या प्रतिकृती (मॉडेल्स) आणि प्रयोग सादर करून सृजन उत्सव साजरा केला.या सृजनोत्सवाचा आनंद घेत असताना मला रुई धा.येथील या ‘बाल वैज्ञानिकांमध्ये भविष्यातील यशस्वी नांदी दिसत आहे!’ असे गौरवोद्गार बरडशेवाळा बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाछे यांनी रुई धा.येथे संपन्न झालेल्या विज्ञान व गणित प्रयोगशाळेतील पारितोषिक समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून सोलार फॅन
रोबोट,सूर्यमाला,हायड्रोलिक ब्रिज,जलचक्र,एटीएम,मशीन, पर्सनल फॅन,सोलर फॅन,किडनी मॉडेल,स्क्वेअर मॉडेल,हुमन बॉडी,जॉमेट्रीकल गार्डन,चांद्रयान,वॉटर पुरिफिकेशन,वॉटर रिसोर्सेस,थ्रीडी ॲनिमेशन,वॉटर सायकल,’सुंदर माझे घर’ या प्रतिकृतीचे प्रदर्शन आयोजित केले होते.या प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून सोपान कदम,कांचन सूर्यवंशी,अरविंद गायकवाड यांनी काम पाहिले.तर प्रभारी मुख्याध्यापक सुरेश दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली व विज्ञान शिक्षिका श्रीमती स्नेहल ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे विज्ञान व गणित प्रदर्शन उत्कृष्ट नियोजनातून यशस्वी झाल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे यांनी उपरोक्त दोघांचेही अभिनंदनासह कौतुक केले.
सदरील प्रदर्शनाची सांगता उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते विजेत्या बाल वैज्ञानिकांच्या बक्षिस वितरण समारंभाने करण्यात आली.यावेळी केंद्रप्रमुख शिवाजी कदम, धानोरा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक विठ्ठल खंडाळे यांसह आदींची उपस्थिती होती.तर सदरील प्रदर्शन व बक्षिस वितरण समारंभाच्या यशस्वीतेसाठी समाधान भोयर,शिक्षिका धुळे, वानखेडे, धुमाळ,तेलंग,पिंगलवाड यांनी परिश्रम घेतले.
अंबाळाचे मुख्याध्यापक सुरेश दंडवते यांनी घेतला या शाळेचा अधिभार व सुरळीत झाला शाळेचा कार्यभार…
विशेष बाब म्हणजे काही तांत्रिक कारणांमुळे जि.प.प्रा. शाळा रुई धा.येथील मुख्याध्यापकांचा पदभार रिक्त झाला होता. सेवारत शिक्षक कार्यक्षम व विद्यार्थी गुणवंत आहेत,परंतू मुख्याद्यापक नसल्याने शाळेच्या कार्यभाराची घडी विस्कटली होती.यामुळे ग्रामस्थ पालकांच्या मागणीवरुन जि.प.प्रा.शाळा अंबाळा ता. हदगाव येथील सेवारत मुख्याध्यापक गोविंद उर्फ सुरेश दंडवते यांना या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला.शांत,संयमी,मितभाषी,उत्तम वक्ता व निवेदक,अभ्यासू व मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले उपक्रमशील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित असलेले मुख्याध्यापक सुरेश दंडवते यांना आग्रही हा अधिभार देण्यात आला व ही नियुक्ती सार्थकी ठरली.सहकारी शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांत समन्वय साधण्यात अवघ्या काही कालावधीत त्यांना यश आले आणि सुप्त गुणांना चालना देता आली.त्याचे फलित म्हणजे संपन्न झालेल्या विज्ञान व गणित प्रदर्शनातील बाल वैज्ञानिकांच्या प्रतिकृती समोर येणे होय. मुख्याध्यापक सुरेश दंडवते यांनी घेतला या शाळेचा अधिभार व सुरळीत झाला शाळेचा कार्यभार… असे म्हणने चुकीचे होणार नसून पालक व विद्यार्थ्यांतून त्यांच्या कर्तव्याबाबद समाधान व्यक्त होत आहे.