शेतकरी आत्महत्या पीडित कुटूंबियांना आ.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते झाले धनादेशांचे वाटप
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचीत आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी विधानसभेत संविधानिक शपथ घेतल्यानंतर मतदार संघात पहिलीच भेट दिली व या भेटीत भोकर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी पीडित कुटूंबियांना त्यांच्या हस्ते भोकर उपविभागीय कार्यालयात प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
भोकर तालुक्यातील ५ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीस कंटाळून गेल्या काही महिन्यांपुर्वी आत्महत्या केली होती. यावळी पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली व महसूल विभागाने रितसर पंचनामा करुन तहसिलदार यांच्या मार्फत पीडित कुटूंबियांना अर्थ सहाय्य मिळावे म्हणून शासनास तो अहवाल पाठविला.यानुसार शासकीय योजनेंतर्गत पीडित कुटूंबियांसाठी प्रत्येकी १ लाख रुपये अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले.त्या अर्थ सहाय्य अनुदानाचे धनादेश आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी,नायब तहसिलदार सय्यद उमर यांच्या प्रमुख उपस्थितीत आत्महत्या केलेल्या त्या ५ शेतकऱ्यांच्या कुटूंबितील वारसांना वाटत करण्यात आले.ते धनादेश स्विकारणाऱ्या पीडित शेतकरी कुटूंबियांच्या वारसदारांत पुजा दत्ता डांगे रा.हस्सापुर ता.भोकर,लावण्या नरेश रेड्डी कुंटलवाड रा.किनी ता.भोकर,लक्ष्मण चंदु तोडे रा. सोनारी ता.भोकर,लक्ष्मीबाई व्यंकटी हेगडे रा.लगळुद ता. भोकर,राहुबाई प्रेमलवाड रा.पिंपळढव ता.भोकर यांचा समावेश होता.
तर या धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी नांदेड जि.प.च्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,भाजपाचे किशोर पाटील लगळुदकर,तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,शहराध्यक्ष विशाल माने,सभापती जगदीश पाटील भोसीकर,विधानसभा प्रभारी भगवानराव दंडवे,संचालक रामचंद्र मुसळे,अमोल शहागंठवार,विठ्ठल धोडंगे,माजी जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुंटवार,रि.पा.इं चे तालुकाध्यक्ष जयभीम पाटील,युवा मोर्चाचे वेणु पाटील कोंडलवार यांसह आदींची उपस्थिती होती.