दांडपट्टा स्पोर्टस असोशिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी उत्तम बाबळे

तर जिल्हा सरचिटणीसपदी बालाजी गाडेकर यांची नियुक्ती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
कोल्हापूर : प्राचीन युद्ध कलेत वीर योद्धे मर्दानी शस्त्र म्हणून ‘दांडपट्टा’ वापरत होते.त्या ‘दांडपट्ट्यास’ महाराष्ट्र राज्य शासनाने ‘राज्य शस्त्र’ म्हणून घोषित केले आहे. मर्दानी क्रीडा कलेतून ‘दांडपट्टा’ या राज्य शस्त्राची माहिती व्हावी व या क्रीडा कलेतून निपुण खेळाडू तयार व्हावेत या उदात्त हेतूने दांडपट्टा स्पोर्टस असोशिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना झाली आहे.या संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी संपादक उत्तम बाबळे यांची व जिल्हा सरचिटणीसपदी उत्कृष्ट खेळाडू तथा क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांची संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप लाड यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.सदरील नियुक्तीचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
प्राचीन काळापासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ते आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे पर्यंत ‘दांडपट्टा’ यास मर्दानी शस्त्र म्हणून वापरले जायचे.आज घडीला दांडपट्टा चालविणे ही युद्ध कला जरी नसली तरी एक मर्दानी क्रीडा कला म्हणून त्याकडे पाहिले जाते.ही प्राचीन मर्दानी क्रीडा विकसित व्हावी व यातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत,तसेच या खेळाडूंना प्रोत्साहन देता यावे यासाठी दांडपट्टा स्पोर्टस असोशिएशन महाराष्ट्र राज्य ही दांडपट्टा क्रीडा संघटना राज्यात सेवारत झालेली आहे.सदरील संघटनेच्या वतीने दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी कोल्हापूर येथे पहिली राज्य स्तरीय दांडपट्टा क्रीडा स्पर्धा -२०२५ संपन्न झाली आहे.सबंध राज्यात उपरोक्त संघटनेची बांधणी व व्याप्ती करणे सुरू आहे.
अनेक खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे क्रीडा प्रेमी संपादक उत्तम वामनराव बाबळे आणि उत्कृष्ट खेळाडू तथा क्रीडा प्रशिक्षक बालाजी लक्ष्मणराव गाडेकर यांच्या माध्यमातून ‘दांडपट्टा’ क्रीडा प्रकारास विकसित व प्रोत्साहन देऊन उत्कृष्ट खेळाडूंना घडविण्याचे काम नांदेड जिल्ह्यात होऊ शकते.असा विश्वास दांडपट्टा स्पोर्टस असोशिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप लाड यांना वाटल्याने त्यांनी संघटनेचे सचिव बाला साठे,उपाध्यक्ष मास्टर सुभाष मोहिते,खजिनदार गौतम विधाते,सहसचिव अजय शहा, सहखजिनदार महमद रफी शेख,जेष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे, शस्त्र व शास्त्र विशारद आणि लेखक वस्ताद विनायक चोपदार (आबाजी),वस्ताद मनोज बालिंगेकर, सदस्या सौ.दिपाली साठे, महागुरु सुभाष मोहिते यांसह आदी सहकाऱ्यांच्या सहमतीने दांडपट्टा स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नांदेड च्या जिल्हाध्यक्षपदी संपादक उत्तम बाबळे आणि जिल्हा सरचिटणीसपदी बालाजी गाडेकर यांची दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी नियुक्ती केली आहे.सदरील नियुक्तीचे पत्र नुकतेच या दोघांनाही प्राप्त झाले असून या संघटनेच्या व्याप्तीसाठी व खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू,असे नुसन जिल्हाध्यक्ष उत्तम बाबळे आणि सरचिटणीस बालाजी गाडेकर यांनी आश्वस्त केले आहे.तर सदरील नियुक्तीमुळे नांदेड जिल्हा क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून व विविध क्षेत्रातील अनेक स्नेहिजणांकडू उत्तम बाबळे आणि बालाजी गाडेकर यांचे अभिनंदन होत आहे.