गाय ही एक पाळीव प्राणीच नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये ती आई आहे-मारोतराव कवळे

सोमठाणा ता.भोकर येथे गोल्ला गोलेवार यादव समाजाचे नेते नामदेवराव आयलवाड यांच्या हस्ते गो शाळेचा झाला शुभारंभ
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : गाय ही जीवनात एक अतिशय महत्त्वाचा भाग असून ती केवळ एक पाळीव प्राणीच नव्हे तर खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी ती आईच आहे, असे प्रतिपादन व्ही.पि.के.उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.ते सोमठाणा ता.भोकर येथे स्थापन करण्यात आलेल्या गो शाळेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
सोमठाणा ता.भोकर येथे दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री गोविंद कृष्ण गो शाळेचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदरील गो शाळेचे उद्घाटन गोल्ला गोलेवार यादव समाजाचे व ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आला.यावेळी विशेष प्रमुख अतिथी म्हणून व्ही.पि.के. उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांची होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर लिंगमपल्ले,गणेश सूर्यवंशी,संदीप जिल्हेवाड,गोविंद कोंडके,बजरंग दल प्रांत संयोजक गजानन भाऊ पांचाळ,पशूधन विस्तार अधिकारी डॉ.विजय चव्हाण,मुख्याध्यापक शिवाजी माने,कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानेश्वर गोदेवाड,सरपंच बालाजी पोलवाड,हिंगोली लोकसभा क्षेत्र गो संसद राहुल कुंडलवार,बालाजी पाटील,संजय हाके,पांडुरंग गोरटकर यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून देवगिरी प्रांत गोरक्षक प्रमुख किरण भाऊ बिचेवार यांची उपस्थिती होती.गो शाळेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने विशेष अतिथी म्हणून बोलतांना मारोतराव कवळे गुरुजी म्हणाले पुढे म्हणाले की,आपल्या देशात पूर्वीपासूनच गाईला अत्यंत महत्त्व दिले जाते.कारण तिच्या माध्यमातून पवित्रता व समृद्धी आपल्या घरामध्ये नांदण्यास येते.गाईच्या शेणामुळे शेतात भरघोस उत्पन्न घेण्यास मदत होते.तसेच अनेक आजारावर गोमूत्र हे औषधाप्रमाणे काम करते.मनुष्य प्राणीमात्राच्या अनेक आजारावर ते परिणामकारक काम करत असल्यामुळे मानवांचे आरोग्य सुदृढ व जीवनदायी होण्यास मदत होते.असे ही ते म्हणाले.तर उद्घाटक म्हणून बोलतांना नामदेव आयलवाड म्हणाले की,गाय व गुरे पाळणे शेतकऱ्यांसाठी मोठे खर्चीक झाले आहे.त्यामुळे गुरे पाळण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून भाकड झालेली गाय व गुरे कवडीमोल कसयास विकली जात आहेत.राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा आमलात असल्याने गोवंश हत्येवर आळा बसला आहे.तसेच अशा प्रकारच्या गो शाळांतून पशूधनाचे उत्तम प्रकारे पालन होत आहे.श्री गोविंद कृष्ण गो शाळेतून ही पशूधनाचे उत्तम प्रकारे पालन होईल अशी आम्हास खात्री आहे,असे ही ते म्हणाले.सदरील सोहळ्याचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सीता माता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबू पवळे यांनी केले.सदरील सोहळ्यास पंक्रोशितील गोधन मालक व शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.